शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST

रोहिपिंपळगाव येथे डीपी बंद मुदखेड : तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथे गावठाण जवळील डीपी बंद होती, तर दुसऱ्या ठिकाणी डीपी सुरू ...

रोहिपिंपळगाव येथे डीपी बंद

मुदखेड : तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथे गावठाण जवळील डीपी बंद होती, तर दुसऱ्या ठिकाणी डीपी सुरू असल्याने वाद झाला. दुसरी डीपी कशी काय सुरू आहे, असा सवाल वीज वितरणचे कर्मचारी श्रीराम गुरुकुले यांना विचारण्यात आला. त्यावेळी वाद निर्माण होऊन एका गटाने डीपीवरच दगड फेकले. मुदखेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

किनवटमध्ये जोरदार पाऊस

किनवट : किनवट शहर व परिसरात २ मे रोजी जोरदार पाऊस झाला. वादळवाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्यासह झाडांची पडझड झाली, भुईमुगाची काढणी सुरू असताना, पाऊस आल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

दिगंबर पाटील यांना पदक

भोकर : येथील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील उत्कृष्ट कामाबद्दल पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे स्वरूप आहे. याबद्दल पाटील यांचे अनेकांनी स्वागत केले.

भोसीकर सेवानिवृत्त

कंधार : पोखरभोसी येथील मूळचे तथा चंद्रपूर येथील नवोदय विद्यालयाचे प्राचार्य भीमराव भोसीकर सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. सेवानिवृत्तीबद्दल अनेकांनी भोसीकर यांना शुभेच्छा दिल्या.

रामभाऊ चन्नावार यांना अभिवादन

लोहा : शिवसेनेचे ज्येष्ठ रामभाऊ चन्नावार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, उपनगराध्यक्ष शरद पवार, छत्रपती धुतमल, शिवसेनेचे बाळासाहेब कऱ्हाळे, प्रा.बी.एम. पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, भाजपचे करीमभाई शेख, नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पाटील, रत्नाकर महाबळे, गिरीश कन्नावार, शिवाजी पांचाळ उपस्थित होते.

शहापूर येथे रक्तदान शिबिर

देगलूर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहापूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. शिबिराचे उद्‌घाटन पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी मल्लरेड्डी यालावार, गणेश रेड्डी चामावार, किशन पाटील, अविनाश चिंतलवार, अभिजीत नल्लावार, पवनरेड्डी शुरकंटे, नागेश पाटील, मंजुळा सुरावार, प्रदीप देशमुख, सचिन गायकवाड, माधव शहापूरकर आदींनी परिश्रम घेतले.