Nanded Police : नांदेड हादरलं! तलवारी, चाकू अन् गुप्त्यांचा साठा जप्त; पोलिसांचे 'ऑपरेशन फ्लश आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:28 IST2026-05-08T09:26:40+5:302026-05-08T09:28:09+5:30

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत  नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करीत तब्बल पाच हजारांवर घातक शस्त्रांचा साठा जप्त केला.

Nanded Police's 'Operation Flush Out'; Five thousand weapons seized | Nanded Police : नांदेड हादरलं! तलवारी, चाकू अन् गुप्त्यांचा साठा जप्त; पोलिसांचे 'ऑपरेशन फ्लश आऊट

Nanded Police : नांदेड हादरलं! तलवारी, चाकू अन् गुप्त्यांचा साठा जप्त; पोलिसांचे 'ऑपरेशन फ्लश आऊट

Marathi Newsनांदेड :गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत  नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करीत तब्बल पाच हजारांवर घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. एका आरोपीकडून सापडलेल्या शस्त्राच्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी थेट शस्त्रसाठ्याचा गुप्त अड्डाच उघडकीस आणला. तलवारी, खंजीर, कुकरीसह विविध प्रकारची ४ हजार ७९६ शस्त्रे आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.  या मुद्देमालाची किंमत ४३ लाख ५० हजार रुपये आहे.

TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...

गुरू रामदासनगर भागात शस्त्र साठ्याचे मूळ

बुधवारी रात्री बळीरामपूर भागातील अभिजित गिरीधर सातपुते याच्याकडून पोलिसांनी

घातक शस्त्र जप्त केले होते. त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीतून शस्त्रसाठ्याचे मूळ समोर आले.

त्याआधारे नांदेड ग्रामीणचे ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने वजिराबाद पोलिसांच्या मदतीने गुरू रामदासनगर भागात एका ठिकाणी छापा टाकत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.

घातक शस्त्रे हस्तगत

या कारवाईत ३५० तलवारी, ३ हजार ९५२ खंजिर, ३३८ गुत्या, २८ कुकरी आणि २८ फोरग्रीप खंजीर असा एकूण ४ हजार ७९६ घातक शस्त्रांचा समावेश आहे. याशिवाय अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस कारवाईसाठी आल्याचे पाहताच घटनास्थळावरून एका व्यक्तीने पळ काढला. हा शस्त्रसाठा जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी (रा. अबचलनगर) याने केला असल्याचे समोर आले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात उपरोक्त दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title : नांदेड में सनसनी: भारी मात्रा में हथियार जब्त; पुलिस का 'ऑपरेशन फ्लश आउट'

Web Summary : नांदेड पुलिस ने 'ऑपरेशन फ्लश आउट' के दौरान तलवारों और खंजरों सहित 5,000 से अधिक हथियार जब्त किए। छापे में गुरु रामदासनगर में एक गुप्त हथियार डिपो का पता चला। जब्त हथियारों और सामग्रियों का मूल्य ₹43.5 लाख है। दो व्यक्तियों पर शस्त्र अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है।

Web Title : Nanded Shaken: Massive Weapons Cache Seized; Police Operation 'Flush Out'

Web Summary : Nanded police seized over 5,000 weapons, including swords and daggers, during 'Operation Flush Out'. The raid uncovered a hidden arms depot in Guru Ramdasnagar. The seized weapons and materials are valued at ₹43.5 lakhs. Two individuals are booked under the Arms Act.