संशय घेणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन मारले; मुलाच्या साक्षीने आईला आजन्म कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 18:44 IST2026-05-06T18:42:54+5:302026-05-06T18:44:16+5:30

धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर तिने पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला होता

Fake Heart Attack Claim Fails! Wife Sentenced to Life Imprisonment for Electrocuting Husband in Bhokar; Court Delivers Verdict | संशय घेणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन मारले; मुलाच्या साक्षीने आईला आजन्म कारावासाची शिक्षा

संशय घेणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन मारले; मुलाच्या साक्षीने आईला आजन्म कारावासाची शिक्षा

भोकर (जि. नांदेड): वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पतीची विजेचा शॉक देऊन हत्या करणाऱ्या पत्नीला भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने ६ मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आम्रपाली भिमराव हैबते (रा. तळेगाव, ता. उमरी) असे या जन्मठेप सुनावलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

हत्येचा असा होता बनाव
घटनेनुसार, १५ जून २०१९ रोजी भिमराव नागोराव हैबते हे नशेत घरी येऊन बाजेवर झोपले होते. यावेळी आरोपी आम्रपाली हिने घरातील विद्युत वाहिनीच्या साहाय्याने झोपलेल्या पतीला विजेचा शॉक देऊन त्यांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर तिने पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला होता.

साक्षी-पुराव्यांनी गुन्ह्याचा पर्दाफाश
नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर आणि मयताच्या बहिणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या मुलाने दिलेली साक्ष यामुळे आरोपी आम्रपालीचा गुन्हा सिद्ध झाला. या खटल्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. अनुराधा डावकरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्धचे पुरावे न्यायालयात सिद्ध केले.

Web Title : शक करने वाले पति को पत्नी ने बिजली का झटका देकर मारा; बेटे की गवाही से आजीवन कारावास।

Web Summary : नांदेड़ जिले में एक महिला को अपने पति को बिजली का झटका देकर मारने के आरोप में आजीवन कारावास की सजा सुनाई गई, क्योंकि उसे लगातार उसकी वफ़ादारी पर शक था। अदालत में उसके बेटे की गवाही और अन्य सबूतों से उसका अपराध साबित हुआ। अपराध 2019 में हुआ। अदालत ने 6 मई को फैसला सुनाया।

Web Title : Wife electrocutes suspicious husband; life sentence based on son's testimony.

Web Summary : A woman in Nanded district received a life sentence for electrocuting her husband, who constantly suspected her fidelity. Her son's testimony and other evidence proved her guilt in court. The crime occurred in 2019. The court delivered the verdict on May 6th.