शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांसाठीचे टॅब गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेत गेल्या टर्ममध्ये भाजपाची सत्ता होती. माजी अध्यक्ष निशा सावरकर यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डिजिटल तंत्रज्ञान ...

नागपूर : जिल्हा परिषदेत गेल्या टर्ममध्ये भाजपाची सत्ता होती. माजी अध्यक्ष निशा सावरकर यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डिजिटल तंत्रज्ञान सहजतेने हाताळण्यात यावे म्हणून टॅबसाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना टॅब वितरित केले होते. २०१९ मध्ये त्यांची टर्म संपल्यानंतर प्रशासनाने त्यांच्याकडून टॅब परत घेतले. हे टॅब नवीन येणाऱ्या सदस्यांना प्रशासनाने देणे गरजेचे होते; पण प्रशासनाने टॅब कपाटातच ठेवले. कोरोनामुळे ऑनलाइन कामकाजावर भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत समितीच्या बैठकाही ऑनलाइन होत आहेत. आता या टॅबचे महत्त्व वाढले आहे.

डिजिटल इंडियाच्या धर्तीवर सदस्यही अपडेट व्हावा व ग्रामस्थांपर्यंत प्रत्येक योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचावी या उद्देशातून टॅबचे वितरण केले होते. त्यासाठी तत्कालीन जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी प्रयत्न केले होते. ५८ टॅबसाठी २१ लाख रुपयांची तरतूद करून अ‍ॅपल कंपनीच्या टॅबची खरेदी केली होती. भाजपाची टर्म संपल्यानंतर निवडणुका लागल्याने प्रशासनाने ते टॅब परत घेतले. आता नवीन सदस्य येऊन दीड वर्षाचा कालावधी होत आहे. शिवाय कोरोनामुळे सर्व व्यवहार ऑनलाइन सुरू आहेत. सभा, बैठका ऑनलाइन होत असून सदस्यांना पंचायत समितीमध्ये जाऊन बैठकीत सहभागी व्हावे लागते. त्यानंतरही टॅब वितरित न करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. प्रशासनाने कपाटात ठेवण्यासाठी टॅब घेतले होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात प्रशासन आणि नवीन लोकप्रतिनिधींनाही टॅबच्या बाबतीत विसर पडलेला आहे.

- आता खरी गरज आहे

आम्ही सदस्यांच्या हितासाठी टॅबची मागणी केली होती; परंतु विरोधकांनी तेव्हा विरोधही केला होता, तरीही प्रत्येक सदस्याला टॅब मिळवून दिला. आमची टर्म संपल्यानंतर जुन्या सर्व सदस्यांनी जि.प. प्रशासनाकडे टॅब परत केला. कोरोनामुळे ऑनलाइन कामाचे महत्त्व वाढले आहे. आम्ही ज्या उद्देशाने टॅब दिले होते, त्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.

निशा सावरकर, माजी अध्यक्ष, जि.प.

- टॅबच्या बाबतीत प्रशासनाबरोबर सर्वांनाच विसर पडला होता. मुळात नवीन सदस्य निवडून आल्यानंतर त्यांना प्रशासनाने टॅब देणे गरजेचे होते. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आज त्याची उपयुक्तताही सिद्ध झाली आहे. सर्व सदस्यांना टॅब द्यावे, अशी मागणी प्रशासनाला करू.

व्यंकट कारेमोरे, विरोधी पक्षनेते, जि.प.