'पेपर फुटी संदर्भात कठोर शिक्षा करणारा कायदा हवा' मनसे नेते अमीत ठाकरे यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: May 19, 2026 20:03 IST2026-05-19T20:02:13+5:302026-05-19T20:03:14+5:30

Nagpur : नीटचा पेपर फुटणे हे काही पहिल्यांदा झालेले नाही. पुण्यापासून सुरू झाले, एक एक पेपर १५ ते २० लाखाला विकला गेला. एनटीएचएस चे लोक खाजगी क्लासेसशी संबंधित आहेत.

'We need a law with strict punishment for paper fraud', demands MNS leader Amit Thackeray | 'पेपर फुटी संदर्भात कठोर शिक्षा करणारा कायदा हवा' मनसे नेते अमीत ठाकरे यांची मागणी

'We need a law with strict punishment for paper fraud', demands MNS leader Amit Thackeray

नागपूर : नीटचा पेपर फुटणे हे काही पहिल्यांदा झालेले नाही. पुण्यापासून सुरू झाले, एक एक पेपर १५ ते २० लाखाला विकला गेला. एनटीएचएस चे लोक खाजगी क्लासेसशी संबंधित आहेत. या गोष्टी वारंवार घडवून आणणाऱ्यांना कायद्याची भिती वाटली पाहिजे. त्यामुळे पेपर फुटी संदर्भात कठोर शिक्षा करणारा कायदा हवा, अशा मागणी मनसेचे युवा नेते अमीत ठाकरे यांनी केली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना अमीत ठाकरे म्हणाले, एकीकडे सामान्य घरातला मुलगा असेल दुसरीकडे आणि एखाद्याचे वडील श्रीमंत असेल तो त्याला १५ मिनिटं आधी पेपर दाखवत असेल तर त्यावर काय स्थिती उद्भवत असेल. हेराफेरी करून अनेकांनी पैसे कमावले. आता परीक्षा रद्द करणे हा पर्याय आहे का, काठोर कारवाई होऊन उदाहरण सेट केलं पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, हे माझ्या राज्यात घडायला नको. कुणाच्या मुलांो आयुष्य पुन्हा बरबाद होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे.

जॉन इब्राहिम....बाईक घेऊन निघाले

इंधन बचतीवरून सरकार सांगत आहे की आता देशभक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. ६० टक्के लोक देशात दारिद्र रेषेच्या खाली आहे. त्यांना धान्य सरकार पुरवते. मग सोनं विकत कोण घेतं हे मला माहित नाही. आता म्हणायला लागले परदेश दौरे बंद करा. ‘जॉन इब्राहिम’ सहा मिनिटाच्या अंतरावर बाईक घेऊन निघाले, कशासाठी तुम्हाला सहा बाईक लागतात, किती दिवस असे स्टंट चालतील, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. एक मंत्री बसमधून निघाले आणि त्यांच्यामागे वीस गाड्यांचा ताफा आहे, यांचे पेट्रोल डिझेल कोण भरतो, हा आपल्या लोकांच्या खिशातील पैसा जात आहे, हे प्रश्न विचारायला का नको, असा सवाल त्यांनी केला.
विदर्भ दौरा करणार

मनसेच्या संघटन बांधणीसाठी लवकरच आपण विदर्भाचा दौरा करणार आहोत. राज ठाकरे यांच्या सोबत असणाऱ्या लोकांशी भेटून पक्ष वाढवू, असा निर्धार अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

Web Title: 'We need a law with strict punishment for paper fraud', demands MNS leader Amit Thackeray