शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बदलीचा आदेश फिरवला

By admin | Updated: December 19, 2015 03:04 IST

दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत ..

पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा मध्यबिंदू : खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री सरसावलेनरेश डोंगरे नागपूरदोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा ‘तो‘ आदेशच बदलवला. परिणामी काही प्रमाणात का होईना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील रोष निवळण्यास मदत झाली आहे.गृहविभागाने ३ डिसेंबरला अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, बढत्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर ५ डिसेंबरला राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापूरचे अधीक्षक मनोज शर्मा यांचाही समावेश होता. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या शर्मा यांची कोल्हापूरहून बृहन्मुंबईला उपायुक्त म्हणून बदली जाहीर करण्यात आली होती. तर, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिकचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना कोल्हापूरला अधीक्षक म्हणून नेमण्यात आले. देशपांडेंच्या रिक्त जागेवर वाशिमच्या अधीक्षक विनिता साहू, तर साहू यांच्या रिक्तपदी भंडाराचे अधीक्षक दिलीप झळके आणि उपायुक्त एम. के. भोसले यांना मुंबईहून त्याच पदावर बृहन्मुंबईला पाठविण्यात आले होते. भंडारा अधीक्षक पद रिकामे ठेवण्यात आले होते. बदल्यांची ही यादी जाहीर होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात (एका गटात) कमालीची खदखद निर्माण झाली होती. काही अधिकाऱ्यांनी या बदल्यांसाठी जोर लावल्याचे आणि वरिष्ठ पातळीवर एकतर्फी निर्णय घेतल्याचे उघडपणे बोलले जात होते. ‘मानहानीकारक निर्णय‘ अशा शब्दात या बदलीचे विश्लेषण करून बहुतांश वरिष्ठ नाराजी व्यक्त करीत होते. ही नाराजी कोल्हापूर, मुंबई, पुण्यापासून गडचिरोली, गोंदियापर्यंत चर्चेला आली होती. पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालयात सेतू म्हणून काम करणाऱ्या काहींनी ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. त्याची दखल घेत ५ डिसेंबरच्या बदलीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी फिरवला. नवा आदेश, नवी जबाबदारी त्यानुसार, १५ डिसेंबरला तीन पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, बृहन्मुंबईतील उपायुक्त प्रशांत होळकर यांना वाशिमचे पोलीस अधीक्षक, विनिता साहू यांना गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक ऐवजी भंडारा येथे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना वाशिम ऐवजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले.‘त्यांच्या‘साठीही संकेत गृहविभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या थेट मुख्यमंत्र्यांनीच पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा मध्यबिंदू साधून खदखद शांत करण्याचे प्रयत्न केल्यामुळे खदखद निर्माण होण्यास कारणीभूत घटक आपसूकच शांत झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे वरिष्ठ पातळीवर लॉबिंग करणाऱ्या आणि एकतर्फी निर्णय घेणाऱ्यांनाही चांगले संकेत गेल्याचे बोलले जाते.