शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

मनपा मुख्यालयात शुकशुकाट; भीती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेता महापालिका मुख्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेता महापालिका मुख्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. परंतु त्यानंतरही मनपा मुख्यालयात कामाशिवाय फिरणारे दिसतात. पदाधिकाऱ्यांशिवाय नगररचना विभागात लोकांची गर्दी दिसायला लागली आहे. सामान्य दिवशी मुख्यालयात बाहेरील लोकांची वर्दळ अधिक असते. लॉकडाऊननंतर गर्दी काही प्रमाणात कमी झाली.

मुख्यालय परिसरात बँक, एटीएम आहे. यामुळे बाहेरील नागरिक येतात. परंतु मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कामाशिवाय परिसरात नागरिक येत असल्याचा इन्कार केला. मनपा मुख्यालयात मोठ्या संख्येने कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह येत आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे. यामुळे विभाग प्रमुखासह मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. यामुळे कामानिमित्त येणाऱ्या बाहेरील व्यक्तीशी बोलायला कुणी तयार नाही.

...

महापौर कक्षातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

महापौर कक्षात कार्यरत असलेले लोखंडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. महापौर दयाशंकर तिवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर कक्षातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तीने ते चार कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. मनपाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चपराशी लोखंडे याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. यापूर्वी वित्त विभागातील एका चपराशाचा मृत्यू झाला होता. लक्ष्मीनगर झोनमधील जेई, विद्युत विभागातील कर्मचारी याचा दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला.

..

पदाधिकाऱ्यांच्या कक्षात शुकशुकाट

कोरोना संक्रमणाच्या धास्तीमुळे मागील काही दिवसात पदाधिकाऱ्यांच्या कक्षात शुकशुकाट दिसत आहे. पदाधिकारीही मनपात येण्याचे टाळत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांची वर्दळ कमी झाली आहे. कक्षाबाहेर चपराशी दिसत नसल्याने शुकशुकाट दिसत आहे.