जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे. ...
नागपूरकर जेव्हा आपल्या वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरतात तेव्हा ते वर्ष २००१-२००२ मध्ये बनविण्यात आलेल्या रस्त्यांसाठी सेस अदा करतात. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वर्ष २००९ ते २०१२ पर्यंत वसूल करण्यात आलेल्या सेसचा कुठलाही लेखाजोखा उपलब्ध नाही. ...
खासगी कंपन्या व संस्थांना सेवा पुरविण्यासाठी ग्राहकांचा आधार कार्डाचा डेटा मागण्यास मज्जाव करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर आता २७ कोटी मोबाइल फोनधारकांच्या आधार कार्ड डेटावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. ...
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनच ...
नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ...
अप्रमाणित आयुर्वेदिक औषधांचे बेकायदेशीरीत्या रिपॅकिंग व रिलेबलिंग करून रुग्णांना विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून विश्लेषण अहवालाच्या आधारे जरीपटका आणि प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंत विदर्भातील ७८८ सिंचन प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच, ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यापैकी १३४ सिंचन प्रकल्पांचे का ...
महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली. ...
महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...