पर्यटन दिन विशेष; नागपूर ठरणार बौद्ध पर्यटनाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:38 AM2018-09-27T10:38:36+5:302018-09-27T10:41:00+5:30

जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे.

Tourism Day Special; The focal point of Buddhist tourism as Nagpur becomes | पर्यटन दिन विशेष; नागपूर ठरणार बौद्ध पर्यटनाचा केंद्रबिंदू

पर्यटन दिन विशेष; नागपूर ठरणार बौद्ध पर्यटनाचा केंद्रबिंदू

googlenewsNext
ठळक मुद्देदीक्षाभूमीला जोडून प्रेरणादायी स्थळांचे सर्कल जगभरातील पर्यटकांना अभ्यासाची संधी

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे. यासोबतच एक नवी ओळख उपराजधानीला मिळत आहे. समतेची प्रेरणाभूमी म्हणून जगातल्या बौद्ध अनुयायांचे आदरस्थान असलेल्या दीक्षाभूमीच्या असण्याने प्रकाशझोतात असलेली संत्रानगरीच्या आसपास अनेक महत्त्वाची प्रेरक स्थळे अस्तित्वात आहेत. त्यामुळे हे संपूर्ण सर्कल दीक्षाभूमीशी जोडले तर हे क्षेत्र बौद्ध पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरू शकते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागलोकांची भूमी म्हणून या क्षेत्राचा उल्लेख केला होता व ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनासाठी त्यांनी नागपूरची निवड केली होती. त्यांच्या धम्मदीक्षेनंतर या भूमीला समतेची भूमी ही नवी ओळख प्राप्त झाली आहे. दरवर्षी धम्मदीक्षा सोहळ्याच्या वेळी लाखो बौद्ध अनुयायी जगाच्या कानाकोपऱ्यातून नागपूरला प्रेरणा घेण्यासाठी येत असतात. मात्र येथे येणाºया बहुतेक अनुयायांना नागपूरच्या आसपास असलेल्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्याची इच्छा होते. त्यापैकी कामठीतील ड्रॅगन पॅलेस, कळमेश्वर रोडवरील चिचोली आणि रामटेकमध्ये नागार्जुन टेकडीचा उल्लेख करावा लागेल. ड्रॅगन पॅलेसमध्ये मास ट्रेनिंग सेंटर, विपश्यना कें द्र निर्माण करण्यात आले आहे. चिचोली येथे डॉ. बाबासाहेब उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचे संग्रहालय त्यांचे सहकारी गोडबोले यांनी तयार केले आहे. शासनाने दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसला ‘अ’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. विशेष म्हणजे यातील दीक्षाभूमी, चिचोली व ड्रॅगन पॅलेसला बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट म्हणून विकसित करण्याची योजना शासनाने आखली आहे.
याशिवाय आसपासच्या क्षेत्रात असलेली आणखी काही महत्त्वाची स्थळे भेट देण्याचे आणि अभ्यासाचे केंद्र ठरू पाहत आहेत. यामध्ये रामटेक येथील नागार्जुन टेकडी, कामठी रोडवरील नागलोक प्रशिक्षण केंद्र, भंडारा जिल्ह्याातील पवनीपासून दोन किमी अंतरावर असलेले सिंदपुरीचे स्तूप, चंद्रपूरच्या भद्रावतीजवळ उत्खननात सापडलेली विज्ज्यासन लेणी, वर्धा येथील धर्मानंद कोसंबी यांनी निर्माण केलेले स्तूप, चिमूरजवळचे भदंत ज्ञानज्योती यांचे विहार तसेच बोरधरण येथे असलेले चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग यांचे स्मारक आदींचा समावेश आहे. ह्यू-एन-त्संग याने आपल्या प्रवास वर्णनात नागपूर, चंद्रपूर, रामटेक व भद्रावतीचा उल्लेख केला असून या भागात हजारो बौद्ध भिक्खू वास करीत होते, असे वर्णन केले आहे. त्यामुळे परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला असून अभ्यासकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

रामटेकची नागार्जुन टेकडी
भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या पुढाकाराने विकसित होत असलेल्या रामटेकच्या नागार्जुन टेकडी परिसरात उत्खननात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. आचार्य नागार्जुन हे जगात रसायनतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते व त्यांचा वास याच परिसरात होता. त्यांनी या भागात मोठी प्रयोगशाळा निर्माण केली होती ज्यामध्ये ते रसायने व आयुर्वेदावर संशोधन करीत होते. याशिवाय हजारो भिक्खूंचे निवास येथे होते. उत्खननात ही प्रयोगशाळा व भिक्खूंचे निवास असलेले बौद्ध अवशेष सापडले आहेत. हा भाग पितखोरे म्हणून प्रसिद्ध होता व हयू-एन-त्संग यानेही या क्षेत्राचा उल्लेख त्याच्या प्रवासवर्णनात केला आहे.

भद्रावतीला उत्खननात सापडली लेणी
चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावतीजवळ तीन किलोमीटर अंतरावर नुकत्याच झालेल्या उत्खननात विज्ज्यासन लेणी सापडल्या आहेत. या लेण्यांबद्दलही हयू-एन-त्संग यांच्या प्रवास वर्णनात उल्लेख सापडतो. पुरातन काळात हे बौद्ध प्रशिक्षण केंद्र होते.


शासनाने प्रस्तावित केलेल्या बौद्ध टुरिस्ट सर्किट योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. नुकतीच या प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली. चिचोली येथील संग्रहालयाचे काम प्रगतीवर आहे. याशिवाय दीक्षाभूमी येथे काही कामांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे हे सर्किट लवकरच मूर्तरूपात साकार होईल, अशी आशा आहे.
- अश्विन मुद््गल, प्रभारी सभापती, नागपूर सुधार प्रन्यास

Web Title: Tourism Day Special; The focal point of Buddhist tourism as Nagpur becomes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन