शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रेडियन्स रुग्णालयाला १०.३२ लाख परत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाने कोविड रुग्णालयांचे दर निश्चित केले आहेत. असे असतानाही पारडी रोडवरील रेडियन्स ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र शासनाने कोविड रुग्णालयांचे दर निश्चित केले आहेत. असे असतानाही पारडी रोडवरील रेडियन्स रुग्णालयाने ९२ कोविड रुग्णांकडून एकाच चाचणीसाठी वेगवेगळे दर आकारून १०.३२ लाखाची जादाची रक्कम वसूल केली. वसूल करण्यात आलेली जादाची रक्कम परत करण्याचे आदेश मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिले आहेत.

खासगी कोविड रुग्णालयातील ८० टक्के बेडवर दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांचे दर निश्चित केले आहेत. या नियमाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. परंतु रेडियन्स रुग्णालयात एकाच चाचणीसाठी ९२ रुग्णांकडून वेगवेगळे दर आकारून १० लाख ३२ हजार २४३ रुपये जादा वसूल केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या संदर्भात दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. परंतु रुग्णालयाने या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे रुग्णांना सात दिवसात वसूल करण्यात आलेली जादा बिलाची रक्कम परत करून याबाबतचा अनुपालन अहवाल पाठविण्याचे निर्देश शर्मा यांनी रेडियन्स रुग्णालयाला दिले आहेत. रक्कम परत न केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

....

अन्य रुग्णालयांच्याही तक्रारी

रेडियन्स रुग्णालयाप्रमाणे अन्य कोविड खासगी रुग्णालयांनीही रुग्णांकडून जादा बिल वसूल केल्याच्या तक्रारी आहेत. चौकशीनंतर अशा रुग्णालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.