नागपूर: NEET परीक्षेतील कथित पेपर लीक आणि निकालातील गोंधळाच्या निषेधार्थ आज नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध केला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बडकस चौकात घोषणाबाजी
आज दुपारी नागपूर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बडकस चौकात जमले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परीक्षेतील या गैरप्रकारामुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि अविश्वास निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
बडकस चौकात कडक पोलीस बंदोबस्त
आंदोलनाचे ठिकाण संघ मुख्यालयाजवळ असल्याने पोलिसांनी सकाळपासूनच या परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, आक्रमक कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्ससमोर उभे राहून जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली होती.
Web Summary : Youth Congress protested in Nagpur against the NEET paper leak, demanding the education minister's resignation. Activists gathered near the RSS headquarters, alleging injustice to students and questioning the NTA's conduct. The protest caused traffic disruption, with heavy police presence.
Web Summary : युवा कांग्रेस ने नीट पेपर लीक के खिलाफ नागपुर में प्रदर्शन किया और शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग की। कार्यकर्ताओं ने आरएसएस मुख्यालय के पास विरोध प्रदर्शन किया, छात्रों के साथ अन्याय का आरोप लगाया और एनटीए के आचरण पर सवाल उठाया। विरोध प्रदर्शन से यातायात बाधित हुआ, भारी पुलिस बल तैनात किया गया।