शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 23:30 IST

Nagpur Madgaon Goa Biweekly Train Regular: नागपूर आणि मडगाव दरम्यान धावणारी 'स्पेशल' ट्रेन आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे.

Nagpur Madgaon Goa Biweekly Train Regular: गेल्या काही काळापासून विशेष किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी सुरू केलेल्या ट्रेन नियमित करण्याची मोठी प्रक्रिया भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून विदर्भातून थेट गोव्यापर्यंत जाणारी द्विसाप्ताहिक ट्रेन सेवा नियमित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. १६ मे २०२६ पासून नागपूर ते मडगाव या मार्गावर धावणारी विशेष ट्रेन नियमित सेवा म्हणून चालवली जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११३९ आणि ट्रेन क्रमांक ०११४० नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष ट्रेन सुरू करण्यात आली होती. या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातून थेट गोव्याला जाणारी ही सेवा नागपूर, शेगाव, नाशिक, कल्याण, पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगाव या मार्गावरून जात असल्याने या भागातील सर्व प्रवाशांना याचा लाभ होत होता. त्याशिवाय मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी एका ट्रेनचा पर्याय मिळत होता. त्यामुळेच ही ट्रेन आता नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नागपूर-मडगाव दरम्यानची 'स्पेशल' ट्रेन आता कायमस्वरूपी

- नागपूर आणि मडगाव दरम्यान धावणारी 'स्पेशल' ट्रेन आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि कोकण जोडणारी ही सेवा आता अधिक सोयीस्कर होणार आहे. या ट्रेनला आता 'नियमित एक्सप्रेस'चा दर्जा मिळाला आहे. आता ट्रेनचा नवीन नंबर ११२०३/११२०४ असा असणार आहे. सुमारे १३३० किमी अंतरात ही ट्रेन एकूण २६ स्थानके घेते.

- नागपूरहून ही ट्रेन दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी मडगाव येथे पोहोचते. 

- परतीच्या प्रवासाला मडगावहून ही ट्रेन दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०९ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचते. 

- ही ट्रेन विदर्भ-खान्देश भागात वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ या स्थानकावर थांबते.

- उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई भागात नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल या ठिकाणी थांबते.

- कोकणात रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी या स्थानकावर थांबते.

- भुसावळ आणि पनवेल येथे गाडीत पाणी भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. या गाडीला एकूण २४ कोच असून, यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी अशा सर्व प्रकारचे कोच आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Train from Vidarbha Regularized, Relief for Passengers, Mumbai Benefit

Web Summary : The Nagpur-Madgaon bi-weekly train is now regular, benefiting passengers from Vidarbha, Nashik, and Mumbai. Starting May 16, 2026, train numbers 11203/11204 will run regularly, offering convenient travel to Goa with stops across key locations.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणShegaonशेगावNashikनाशिकnagpurनागपूरkalyanकल्याणpanvelपनवेलRatnagiriरत्नागिरीgoaगोवा