Haryana Local Body Election 2026:भाजपाने पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणुकीतील विजयाची लय हरियाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही कायम ठेवली आहे. भाजपाने अंबाला आणि सोनीपत यांसह इतरही नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या विजयाबद्दल जनतेचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
अंबाला महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अक्षिता सैनी यांनी काँग्रेसच्या कुलविंदर कौर यांचा २१,३५८ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार सोनिया राणी तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. सोनीपतमध्ये भाजपाचे राजीव जैन यांनी काँग्रेसचे उमेदवार कमल देवान यांचा २३,२४७ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आयएनएलडीचे आनंद कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
पंचकुला, रेवाडी, धारुहेरा येथे भाजपाला मोठे यश
पंचकुला महानगरपालिकेत भाजपाचे श्यामलाल बन्सल यांनी काँग्रेसच्या सुधा भारद्वाज यांच्या विरोधात अभेद्य आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्षाचे राजेश कुमार तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या तिन्ही महानगरपालिकांचे महापौरपद भाजपाच्या ताब्यात आहे. रेवाडी नगर परिषदेत भाजपाच्या विनिता पिप्पल यांनी काँग्रेसच्या नेहरिका यांचा २१,४४५ मतांनी पराभव केला. धारुहेरा नगरपालिकेत भाजपाचे सत्यनारायण उर्फ अजय जांगरा यांनी अपक्ष उमेदवार बाबूलाल यांचा ६,२३६ मतांनी पराभव केला. सांपला नगरपालिकेत भाजपचे प्रवीण यांनी अपक्ष उमेदवार अंकित यांचा ६८७ मतांनी पराभव केला.
भाजपाने आतापर्यंत १० वॉर्ड जिंकले आहेत
वॉर्ड निवडणुकीतही भाजपाने लक्षणीय यश मिळवले. अंबाला नगर परिषदेच्या २० वॉर्डांपैकी भाजपने १६ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने तीन आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली. सोनीपतमध्ये भाजपने १७ वॉर्ड जिंकले, तर काँग्रेसने पाच वॉर्ड जिंकले. काही वॉर्डांमध्ये काँग्रेसचे उमेदवार अपक्ष उमेदवारांपेक्षाही मागे होते. पंचकुलामध्ये मतमोजणी सुरू असून, भाजपाने आतापर्यंत १० वॉर्ड जिंकले आहेत.
दरम्यान, हरियाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा विजय भाजपा-एनडीए सरकारने राबवलेल्या विकास आणि सुशासनाच्या धोरणांवर जनतेचा असलेला अढळ विश्वास पुन्हा एकदा सिद्ध करतो. हा विजय राज्याच्या डबल-इंजिन सरकारवर हरियाणाच्या जनतेचा असलेल्या विश्वासाचेही प्रतीक आहे. या प्रसंगी, भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशी पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
Web Summary : BJP secured victories in Haryana's local body polls, including key mayoral posts in Ambala and Sonipat. PM Modi thanked the public, attributing the win to faith in the government's development policies and the double-engine government's success.
Web Summary : हरियाणा के स्थानीय निकाय चुनावों में बीजेपी ने अंबाला, सोनीपत में जीत दर्ज की। पीएम मोदी ने जनता का आभार व्यक्त करते हुए इसे विकास नीतियों और डबल इंजन सरकार पर विश्वास बताया।