क्रिकेट जगतातील महान फलंदाज विराट कोहली याने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा MS धोनीचा सर्वकालीन विक्रम मोडीत काढत कोहली इथंही किंग ठरला आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर मैदानात उतरताच सर्वाधिक सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग कोहलीनं MS धोनी आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वाधिक सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग कोहली अव्वल
RCB विरुद्ध MI यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी एकाच सामन्यात २७८-२७८ सामने खेळताना MS धोनीच्या विक्रमाची बरोबरीचा डाव साधला होता. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात कोहली या दोघांच्या पुढे निघून गेला. KKR विरुद्ध तो IPL मध्ये २७९ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. विशेष म्हणजे विराट कोहली हा IPL च्या पहिल्या हंगामापासून RCB च्या संघाकडूनच खेळत आहे. एकाच फ्रँचायझीकडून खेळताना त्याने हा महारेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. पुढच्या सामन्यात रोहित शर्मा त्याची बरोबरी करेल. पण यंदाच्या हंगामाच्या सरशेवटी कोहलीच नंबर वनचा डाव साधेल, असे चित्र सध्या अगदी स्पष्ट दिसत आहे. कारण MI प्लेऑफ्सपर्यंत पोहचणं मुश्किल आहे. याशिवाय MS धोनीच्या खेळण्याबाबतही संभ्रम आहे.
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे फलंदाज
विराट कोहली -२७९ सामने
महेंद्रसिंह धोनी- २७८ सामने
विराट कोहली- २७८ सामने
रोहित शर्मा- २७८ सामने
रवींद्र जडेजा- २६५ सामने
दिनेश कार्तिक- २५७ सामने
कोहलीच्या नावेच आहे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या विराट कोहलीच्या नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचाही रेकॉर्ड आहे. आतापर्यंत त्याने ९०४० धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ या यादीत रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने आपल्या कारकिर्दीत ७२८९ धावा केल्या आहेत. दोघांच्यात खूप मोठे अंतर आहे.
Web Summary : Virat Kohli surpassed MS Dhoni's record for most IPL appearances in a match against KKR. He now leads with 279 matches, while also holding the record for most IPL runs with 9040.
Web Summary : विराट कोहली ने केकेआर के खिलाफ मैच में सबसे ज्यादा आईपीएल मैच खेलने का एमएस धोनी का रिकॉर्ड तोड़ा। अब वह 279 मैचों के साथ आगे हैं, और उनके नाम 9040 रनों के साथ सबसे ज्यादा आईपीएल रन बनाने का रिकॉर्ड भी है।