शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 20:20 IST

पुण्यात आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Pune Crime : हडपसरमधील काळेपडळ परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी सतत दबाव टाकणाऱ्या आणि धमकावणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्या व्यक्तीचा खून झाला तो त्या तरुणीच्या आईचा प्रियकर होता. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करुन तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत असलेला प्रियकर हा सराईत आहे. दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर , पारस किशोर गायकवाड, अभिजित उर्फ अभी संजय इंगळे, सोमनाथ रमेश दोरकर, साहिल सागर शेलार आणि चंद्रशेखर सोमनाथ जावीर यांना अटक करण्यात आली. गणेश संजू बिरादार असे खून झालेल्याचे नाव आहे.

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुर्गांग मानकर हा सराईत आहे. त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. दुर्वांग याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तर गणेशचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तिच्यावर दबाब आणला होता. गणेशने तरुणीच्या आईला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती दिली होती. या कारणावरून दुर्वांग आणि गणेश यांच्यात वाद झाले होते.

३ मे रोजी हडपसरमधील ससाणेनगर भागात असलेल्या इमारतीच्या परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश थांबला होता. त्यावेळी आरोपी दुर्वांग आणि साथीदार तिथे आले. त्यांनी गणेशला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. गणेश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. पसार झालेल्या आरोपींना सापळा लावून वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Girlfriend's lover brutally murdered by daughter's boyfriend over relationship dispute.

Web Summary : In Pune, a man was murdered for pressuring a girl to end relationship with her boyfriend, who is the prime suspect. The victim had a relationship with the girl's mother. Police arrested the boyfriend and accomplices; investigation ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस