रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या युवा बॅटर अंगकृष रघुवंशीनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक झळकावत त्याने संघाकडून सर्वोच्च धावसंख्या उभारली. अर्धशतकी खेळीनंतर त्याने खास अंदाजात सेलिब्रेशन केले. एवढेच नाही तर त्याने मारलेला एक उत्तुंग षटकार विराट कोहलीच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. किंग कोहलीनं मुंबईकर युवा बॅटरला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईकराच्या फटकेबाजीला कोहलीनं दिली दाद
कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यावर कॅमरून ग्रीनच्या साथीनं रघुवंशीनं संघाचा डाव सावरला. ३२ चेंडूत अर्धशतक साजरे करणारा रघुवंशीनं या सामन्यात ४६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली. त्याने मारलेला षटकार पाहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीनं टाळ्या वाजवत युवा बॅटरला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात २९ चेंडूत ५१ धावांची खेळी करत रघुवंशीनं यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या दोन सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली. आता आरसीबी विरुद्ध त्याने यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले. ७१ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात ११ सामन्यात ३४० करत खास छाप सोडली आहे.
Web Summary : In RCB vs KKR, Angkrish Raghuvanshi's stunning fifty and towering six impressed Virat Kohli. His innings of 71 off 46 balls, featuring 7 fours and 3 sixes, helped KKR recover after losing early wickets. Kohli acknowledged the young batter's impressive performance with applause.
Web Summary : RCB बनाम KKR में, अंगकृष रघुवंशी के शानदार अर्धशतक और ऊंचे छक्के ने विराट कोहली को प्रभावित किया। 46 गेंदों में 71 रनों की उनकी पारी, जिसमें 7 चौके और 3 छक्के शामिल थे, ने शुरुआती विकेट खोने के बाद केकेआर को उबरने में मदद की। कोहली ने युवा बल्लेबाज के प्रभावशाली प्रदर्शन की सराहना की।