शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 22:39 IST

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

पुणे: हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश्य जिवंत वस्तू आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉस्पिटलच्या एका टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आली. तपासादरम्यान या वस्तूमध्ये टायमर यंत्रणा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्यावर तब्बल सात तासांचा टायमर सेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. पोलिसांनी सगळा परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. रुग्णालय परिसरातील वाहतूकही काही काळासाठी वळविण्यात आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्यंत सावधगिरीने संशयित वस्तू ताब्यात घेतली. ही वस्तू पुढील तपासणीसाठी ग्लायडींग सेंटरच्या मोकळ्या जागेत नेण्यात आली. तेथे विशेष पद्धतीने तिची तपासणी करून निष्क्रिय करण्यात आले.

अनेकांनी घाईघाईने हॉस्पिटल परिसर सोडण्याचा प्रयत्न केला

सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण कारवाई नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. बीडीएस पथकाने अत्यंत सावधगिरी बाळगत घटनास्थळी तपास सुरू केला. परिसर पूर्णपणे सील करून कोणतीही अनधिकृत हालचाल होऊ दिली नाही. जवळपास सात तासांच्या प्रयत्नांनंतर संशयास्पद वस्तू सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आली आणि पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटलच्या आत घडल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अनेकांनी घाईघाईने हॉस्पिटल परिसर सोडण्याचा प्रयत्न केला. काही रुग्णांना दुसऱ्या विभागात हलवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुण्याचे पोलिस कमिशनर अमितेश कुमार यांनी घेतला संपूर्ण घटनेचा आढावा

हॉस्पिटल या घटनास्थळी पुण्याचे पोलिस कमिशनर अमितेश कुमार यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरातील नागरिक, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. ही बॉम्ब सदृश्य वस्तू नेमकी कोणी ठेवली आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून हॉस्पिटलमधील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. यामागे एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, उपचारातील वाद, आर्थिक कारण, धमकी किंवा इतर कोणताही वैयक्तिक हेतू असू शकतो का, याचाही तपास पोलिस करत आहेत. या संपूर्ण घटनेविषयी पोलिसांकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bomb-like object found in Pune hospital, sparking panic.

Web Summary : A bomb-like object was discovered in a Pune hospital toilet, causing widespread panic. The object had a timer set for seven hours. Bomb disposal squad secured the area and removed the device. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरhadapsarहडपसरhadapsar policeहडपसर पोलीसHospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी