Join us
Daily Top 2Weekly Top 5

Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाला, दमदार कमबॅक करत नवा इतिहास रचला

By सुशांत जाधव | Updated: May 14, 2026 00:24 IST

Open in App

रायपूरच्या मैदानातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावले.  सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर दमदार कमबॅक करताना शतकी खेळीसह विराट कोहलीनं या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा पल्लाही गाठला. सर्वात जलदगतीने हा डाव साधणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीनं ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ख्रिस गेलच्या वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग, कोहलीनं रचला नवा इतिहास

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर १९३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहीलनं ७८ धावा करताच टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा पल्ला गाठला. ही टप्पा गाठणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. एवढेच नाही तर सर्वात जलदगतीने हा डाव साधत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलनं ४२३ डावात १४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराट कोहलीनं फक्त ४०९ डावात टी-२० क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठत नवा इतिहास रचला आहे.

IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli's Century Creates New World Record in T20!

Web Summary : Virat Kohli scored his 9th IPL century against KKR in Raipur, achieving 14,000 T20 runs. He's the fastest to reach this milestone, surpassing Chris Gayle and setting a new world record after consecutive zeros.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सविराट कोहली