IPL 2026 Virat Kohli Hits Memorable Ton As RCB Beat KKR : विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रायपूरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला ६ विकेट्स आणि ५ चेंडू राखून पराभूत केले. दिमाखदार विजयासह बंगळुरुचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचला. दुसरीकडे कोलकाताचा प्लेऑफ्सचा मार्ग खडतर झाला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना KKR च्या संघाने अंगकृष रघुवंशीच्या आणि रिंकूच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात १९२ धावा करत RCB समोर १९३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा यशस्वी पाठलाग करताना विराट कोहलीनं नाबाद १०५ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजिंक्य रहाणेसह फिन ॲलन स्वस्तात माघारी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. फिन ॲलन ८ चेंडूत १८ धावा करून परतला. भुवीनं त्याची विकेट घेतली. कर्णधार अजिंक्य रहाणेनं १३ चेंडूत १९ धावा करत तंबूचा रस्ता धरला. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
मग रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन
संघ अडचणीत असताना अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचली. सलाम दारनं ३२ धावांवर ग्रीनचा खेळ खल्लास केला. मग रघुवंशीनं उप कर्णधार रिंकू सिंहच्या साथीनं खेळ पुढे नेला या दोघांनी निर्धारित २० षटकात संघाच्या धावफलकावर ४ बाद १९२ धावा लावल्या. रघुवंशी ४६ चेंडूत ७१ धावा करून शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. रिंकून २९ चेंडूत ४९ धावांची नाबाद खेळी केली.
विराटनं नाबाद शतकी खेळीसह संघाला एकहाती जिंकून दिला सामना
धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाची सुरुवात केली. कार्तिक त्यागीनं बेथलच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. तो १२ चेंडूत १५ धावांचे योगदान देऊन परतला. त्यानंतर विराट कोहलीनं सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. दोन झेल सुटल्याचा पुरेपूर फायदा उललत विराट कोहलीनं शेवटपर्यंत मैदानात थांबतून ६० चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी करत संघाचा विजय मिळवून दिला. देवदत्त पडीक्कलनं २७ चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले. कार्तिक त्यागीने त्याची विकेट घेतली. कर्णधार रजत पाटीदारला सुनील नरेन याने ११ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. टीम डेविडही २ धावांवर कार्तिक त्यागीचा शिकार झाला. पण विराट शेवटपर्यंत मैदानात थांबल्यामुळे केकेआरच्या संघाला RCB ला रोखण्यात अपयश आले. जितेश शर्मानं नाबाद ८ धावांची खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्स अव्वलस्थानी; कोलकाता नाईट रायडर्सचे गणित बिघडले
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १२ सामन्यानंतर ८ व्या विजयासह १६ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. त्यांचे प्लेऑफ्समधील स्थान जवळपास पक्के झाले असून आता ते पहिल्या दोनमध्ये राहून क्वॉलिफायर १ च्या लढत खेळण्यासाठी प्रयत्नशील असतील. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्ससाठी स्पर्धेत टिकणं अधिक आव्हानात्मक झाले आहे. ११ सामन्यानंतर ४ विजय आणि पावसामुळे अनिर्णित राहिलेल्या सामन्यातील एका गुणासह त्यांच्या खात्यात ९ गुण जमा आहेत. आता उर्वरित ३ सामने जिंकले तरी ते १५ गुणांपर्यंत पोहचू शकतात. ते 'जर-तर'च्या समीकरणात अडकले असून त्यांचे प्लेऑफ्स गाठण्याचे गणितच बिघडले आहे.
Web Summary : Virat Kohli's unbeaten century powered RCB to a six-wicket victory over KKR in Raipur. RCB topped the points table, while KKR's playoff path became tougher. KKR set a target of 193, which Kohli chased down with 105 not out.
Web Summary : विराट कोहली के नाबाद शतक की बदौलत RCB ने रायपुर में KKR को छह विकेट से हराया। RCB अंक तालिका में शीर्ष पर, जबकि KKR का प्लेऑफ का रास्ता कठिन हो गया। KKR ने 193 का लक्ष्य रखा, जिसे कोहली ने 105 रन बनाकर हासिल किया।