शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या सात महिन्यातच विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त

By admin | Updated: August 24, 2016 02:57 IST

रोड रोमियोसोबत लग्न करून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ चे काम करणारी एक युवती मृत्यूशी संघर्ष करीत आहे.

सासरच्या छळाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न जगदीश जोशी नागपूररोड रोमियोसोबत लग्न करून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ चे काम करणारी एक युवती मृत्यूशी संघर्ष करीत आहे. वर्धमाननगरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला, यात तिचे ‘ब्रेन डेथ’ झाले. पीडित विवाहिता २३ वर्षाची असून, डॉली असे तिचे नाव आहे. गणेशपेठ येथील व्यापारी सेवेंद्र बैरी यांची ती मुलगी आहे. डॉली इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होती. तिची खामला येथील नितीन मीरचंदानी याच्यासोबत ओळख झाली. त्याने स्वत:ला ट्रान्सपोर्ट व्यवसायी सांगितले. नितीनने तिला लग्नाची मागणी घातली. वडिलांचा विरोध असतानाही, मुलीच्या आग्रहास्तव त्यांनी डॉलीचे धुमधडाक्यात लग्न करून दिले. लग्नाच्या एका महिन्यानंतरच नितीनच्या घरच्यांकडून तिला त्रास देणे सुरू झाले. डॉलीला वारंवार पैशाची मागणी करू लागले. नितीन बेरोजगार असल्यामुळे डॉलीच्या घरच्यांनी त्याला पाच लाख रुपये देऊन व्यवसाय करण्यासाठी मदत केली. अशातच डॉली गर्भवती राहिली. या अवस्थेत नितीनने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा गर्भपातही झाला. २१ जुलैला डॉलीचा जन्मदिवस होता. तिची आई, बहीण व भाऊ तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेले. त्याच दिवशी रात्री नितीन उशिरा घरी आला. डॉलीला शिवीगाळ करून मारपीट केली. तिच्या घरच्यांसमोर नितीनचा हा प्रकार बघून डॉलीच्या घरचे तिला घरी घेऊन आले. २५ जुलैला डॉलीने आपल्या आईच्या घरी गळफास घेतला. घरच्यांनी तिला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारात सुधारणा नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिचा ‘ब्रेन डेथ’ झाल्याचे सांगितले. तिच्या उपचारात माहेरच्यांचा १० लाखावर खर्च झाला आहे. नितीनच्या विरोधात अंबाझरी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्याने इंदोरच्या एका युवतीसोबत लग्न केले असल्याची माहिती आहे.