शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

‘कोविशिल्ड’च्या तुलनेत ‘कोव्हॅक्सीन’ला प्रतिसाद कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे पाच दिवस उलटून गेले असताना, ‘कोविशिल्ड’च्या तुलनेत ‘कोव्हॅक्सीन’ला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे पाच दिवस उलटून गेले असताना, ‘कोविशिल्ड’च्या तुलनेत ‘कोव्हॅक्सीन’ला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ५६३ पैकी २१४ लाभार्थ्यांनीच ‘कोव्हॅक्सीन’ घेतली आहे. विशेष म्हणजे, कोविशिल्ड लसीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत, तर कोव्हॅक्सीन लसीचा तिसरा टप्पा अद्यापही सुरू आहे. यातच कोव्हॅक्सीन लस देताना लाभार्थ्याची मंजुरी घेतली जात आहे. याचा परिणाम लसीकरणावर होत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ज्या प्रतिबंधक लसीची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, त्याचा शुभारंभ १६ जानेवारीपासून सुरू झाला. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे ४२ हजार डोस, तर भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीचे २ हजार डोस मिळाले. नागपूर जिल्ह्यात शहरातील पाच, तर ग्रामीणमध्ये सात असे एकूण १२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यातील केवळ मेडिकल केंद्रावर ‘कोव्हॅक्सीन’ तर इतर ११ केंद्रांवर कोवीशील्ड लस दिली जात आहे. मेडिकलमध्ये पहिल्या दिवशी १०० पैकी ५३, दुसऱ्या दिवशी १०० पैकी २९, तिसऱ्या दिवशी १०० पैकी ५२, चौथ्या दिवशी १०० पैकी २१, तर पाचव्या दिवशी १५० पैकी ५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्या तुलनेत शहरातील इतर चार केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- २६९७ पैकी १५२९ लाभार्थ्यांनी घेतली लस

शहरातील पाच केंद्रांवर २६९७ पैकी १५२९ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. यात मेडिकल केंद्रावर ५६३ पैकी २१४, पाचपावली केंद्रावर ५८४ पैकी ३६७, एम्स केंद्रावर ५५० पैकी ४११, डागा केंद्रावर ५०० पैकी २२९, तर मेयो केंद्रावर ५०० पैकी ३०८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

- पाच दिवसांतील लसीकरणाची स्थिती

मेडिकल २१४ ५६३ (कोव्हॅक्सीन)

पाचपावली ३६७ ५८४ (कोविशिल्ड)

एम्स ४११ ५५० (कोविशिल्ड)

डागा २२९ ५०० (कोविशिल्ड)

मेयो ३०८ ५०० (कोविशील्ड)

- ‘कोव्हॅक्सीन’ची ट्रायल सुरू असल्याने दिला नकार

‘कोव्हॅक्सीन’चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (ट्रायल) अद्यापही सुरू आहे. असे असताना लाभार्थ्यांची मंजुरी घेऊन ती लस दिली जात आहे. यामुळे मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. यामुळे तूर्तास लसीकरणाला नकार दिला आहे.

- एक डॉक्टर, मेडिकल

- कोव्हॅक्सीन सुरक्षित लस

गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जुलै महिन्यापासून कोव्हॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली. यात ५० स्वयंसेवकांना, तर दुसऱ्या टप्प्यात ५५ स्वयंसेवकांना लस देण्यात आली. मागील पाच महिन्यात यातील एकालाही गंभीर स्वरूपाची ‘रिअ‍ॅक्शन’ दिसून आलेली नाही. शिवाय, नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये १६८० स्वयंसेवकांवर लसीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. यावरूनच ‘कोव्हॅक्सीन’ लस सुरक्षित आहे. न घाबरता ही लस घ्यायला हवी.

- डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर

संचालक, गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल