शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

चिंचभुवन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासाठी नेत्यांना सवड मिळेना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

वसीम कुरेशी नागपूर : वर्धा मार्गावर चिंचभुवन आरओबीचा रेल्वे रुळाच्या वरील आव्हानात्मक भाग तयार झाला आहे. त्यावर मास्टिकचा स्तर ...

वसीम कुरेशी

नागपूर : वर्धा मार्गावर चिंचभुवन आरओबीचा रेल्वे रुळाच्या वरील आव्हानात्मक भाग तयार झाला आहे. त्यावर मास्टिकचा स्तर चढविण्यात आला आहे. दोन भागात लोड टेस्टही झाली आहे. आधीच एक वर्षापेक्षा अधिक विलंबाने तयार झालेल्या या पुलाच्या कामादरम्यान नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागला; परंतु आता पूल तयार होऊनही नेत्यांची उद्घाटनासाठी तारीख न मिळाल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

पूल वाहतुकीसाठी का खुला करण्यात येत नाही, याबाबत एनएचएआयकडे विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक कारणे सांगितली. त्यांच्या मते रेल्वे रुळाच्या वरील गर्डरच्या भागात लोड टेस्ट करण्यात आली आहे. आता रॅम्पची लोड टेस्ट शिल्लक आहे. त्यासाठी चार दिवसांचा वेळ लागेल. त्याचे विश्लेषण झाल्यानंतर अहवाल तयार होईल. पुलाच्या खाली काही ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे आहे. सदर उड्डाणपुलाच्या बाबतही असेच सांगण्यात येत होते. वाहतूक सुरू होऊ नये, यासाठी मानकापूर स्टेडियमच्या समोरील भागातही काही दिवसांसाठी मंडप टाकण्यात आला होता.

...............

१५ दिवस वेळ लागू शकतो

‘पुलाचे कॉंक्रिटीकरण मजबूत व्हावे, यासाठी नियमित पाणी टाकण्यात आले. पुलाची एक टेस्ट शिल्लक आहे. सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर हा पूल रहदारीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत खुला होऊ शकतो.’

-राजीव अग्रवाल, प्रादेशिक अधिकारी, एनएचएआय.

तारीख न मिळाल्यामुळे उद्घाटन रखडले

चिंचभुवन आरओबीच्या लोड टेस्टचे कारण जानेवारीच्या सुरुवातीपासून सांगण्यात येत आहे; परंतु जानेवारी महिना संपत येऊनही लोड टेस्टचा विषय संपला नाही. चिंचभुवन पुलाला विलंब लागल्यामुळे हा पूल चर्चेत राहिला. सूत्रांनुसार उद्घाटनासाठी नेत्यांची तारीख न मिळाल्यामुळे पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. फेब्रुवारीपासून या पुलावरून वाहतूक सुरू होईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

............