शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेविरुद्धची याचिका खारीज

By admin | Updated: October 6, 2016 03:10 IST

मेट्रो रेल्वेच्या डब्ब्यांचे उत्पादन करण्यासंदर्भातील टेंडर प्रक्रियेत सहभागी एका कंपनीच्या पात्रतेवर आक्षेप घेणारी रिट याचिका

नागपूर : मेट्रो रेल्वेच्या डब्ब्यांचे उत्पादन करण्यासंदर्भातील टेंडर प्रक्रियेत सहभागी एका कंपनीच्या पात्रतेवर आक्षेप घेणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.
टिटागड व्हॅगन कंपनी व टिटागड फायरमा अ‍ॅडलर स्पा या कंपन्यांच्या संघाने ही याचिका दाखल केली होती. मेट्रो रेल्वे डब्ब्यांच्या उत्पादनाचे कंत्राट देण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने २५ जानेवारी २०१६ रोजी नोटीस जारी करून टेंडर आमंत्रित केले होते. हे कंत्राट मिळण्यासाठी याचिकाकर्त्या कंपनीसह चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशन कंपनीने तांत्रिक व आर्थिक बोली सादर केली होती. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी मेट्रो रेल्वेला निवेदन सादर करून चायना रेल्वे कंपनी या कंत्राटासाठी अपात्र असल्याचा दावा केला. मेट्रो रेल्वेने यावर काहीच निर्णय घेतला नाही. दरम्यान, मेट्रो रेल्वेने चायना रेल्वे कंपनीला हे कंत्राट दिले. याचिकाकर्त्यांनी ८५२ कोटी तर, चायना रेल्वे कंपनीने ८५१ कोटी रुपयांची बोली सादर केली होती. चायना रेल्वे कंपनीला अवैधपणे कंत्राट देण्यात आल्याचा दावा करून याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मेट्रो रेल्वेने चायना रेल्वे कंपनी या कंत्राटासाठी कशी पात्र आहे याचे पुरावे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून याचिका खारीज केली. मेट्रो रेल्वेतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अ‍ॅड. कौस्तुभ देवगडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)