शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उष्णतेचा कहर ! दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी, कामगारांनाही ११ ते ४ विश्रांतीचे आदेश

By आनंद डेकाटे | Updated: May 16, 2026 15:46 IST

Nagpur : जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी व्यापक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी व्यापक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार, सर्व कोचिंग क्लासेसना सकाळ आणि सायंकाळच्या सत्रातच वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले असून दुपारी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमध्ये मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासह उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा आणि वर्ग टाळावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. पूर्वनियोजित परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांसाठी थंड पिण्याचे पाणी, ओआरएस आणि परीक्षा हॉल थंड ठेवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. उद्योग, कारखाने, खाणी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी ११ ते ४ या वेळेत कामगारांना विश्रांती देण्यात यावी आणि उघड्यावर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. काम सुरू ठेवणे आवश्यक असल्यास सावलीसाठी शेड, थंड पाण्याची व्यवस्था आणि ओआरएस उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विद्यार्थी वसतिगृहांमध्ये थंड पिण्याचे पाणी, आयव्ही, ओआरएस आणि कुलपॅकची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून दुपारच्या वेळी वसतिगृह थंड राहतील यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्ड वॉर्ड तयार ठेवणे, आवश्यक औषधसाठा, आयव्ही, ओआरएस आणि कुलपॅक उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघातग्रस्त रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवण्याची जबाबदारीही रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांना या उपाययोजनांसाठी नोडल अधिकारी घोषित करण्यात आले असून त्यांनी शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व विभाग, यंत्रणा, अधिकारी आणि आस्थापनांनी आदेशातील निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Heatwave: Coaching Classes Banned in Afternoon, Worker Rest Orders

Web Summary : Due to the severe heatwave, Nagpur has banned afternoon coaching classes and mandated rest for laborers from 11 AM to 4 PM. Colleges are advised to avoid afternoon sessions. Hospitals must prepare for heatstroke patients with necessary resources.
टॅग्स :Heatwaveउष्णतेची लाटHeat Strokeउष्माघातnagpurनागपूरSummerउन्हाळाMaharashtraमहाराष्ट्र