शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

'रिसॉर्टमध्येच लग्न करा, नाहीतर ३ लाख द्या' हुंड्याची मागणी मान्य न केल्याने तोडले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:37 IST

Nagpur : लग्न ठरल्यानंतर अचानक रिसॉर्टमध्ये लग्न करण्याचा अट्टाहास करत तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याची धक्कादायक घटना जरीपटका परिसरात उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
लग्न ठरल्यानंतर अचानक रिसॉर्टमध्ये लग्न करण्याचा अट्टाहास करत तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याची धक्कादायक घटना जरीपटका परिसरात उघडकीस आली आहे. हुंडा देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी संगनमताने लग्न मोडून फिर्यादीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणीचे उमेश नीलकंठ देशभ्रतार (वय ३२, रा. कोंढाळी, ता. काटोल, जि. नागपूर) याच्यासोबत लग्न जुळले होते. त्यानुसार दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत साक्षगंध कार्यक्रमही पार पडला होता. २२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आरोपी उमेश देशभ्रतार याने फिर्यादीला वारंवार फोन करून, रिसॉर्टमध्ये लग्न करावे लागेल; अन्यथा तीन लाख रुपये द्यावे लागतील. जर असे केले नाही तर लग्न होणार नाही, असे म्हटले.

मागणीला आरोपीची आई निरंजना देशभ्रतार (वय ५२) व भाऊ हर्षल देशभ्रतार (वय २८) यांनीही साथ देत संगनमताने हुंड्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तरुणीने हुंडा देण्यास ठाम नकार दिल्यानंतर आरोपींनी लग्न मोडून टाकत तिचा मानसिक छळ केला. या प्रकारामुळे तरुणी व तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला. तरुणीने हिंमत दाखवून जरीपटका पोलिस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dowry demand leads to broken wedding; ₹3 lakh asked.

Web Summary : Nagpur: A wedding was called off after the groom's family demanded ₹3 lakh dowry to hold the ceremony at a resort. The bride refused, leading to mental harassment and a police complaint against the groom and his family.
टॅग्स :marriageलग्नdowryहुंडाnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी