शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेत फॉरेन टूरिस्ट कोट्यात धांदली; ३९ प्रकरणं उजेडात

By नरेश डोंगरे | Updated: May 7, 2026 19:12 IST

Nagpur : मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे.

नरेश डोंगरे - नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मध्य प्रदेशात रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यात गैरप्रकार झाल्याचे प्रकरण खळबळ उडवून गेले असतानाच आता मध्य रेल्वेत विदेशी पर्यटकांच्या (एफटी) कोट्यावर डल्ला मारून त्या तिकिटा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा गोरखधंदा उजेडात आला आहे.

 संघमित्रा एक्सप्रेसमधील तिकिट तपासणीस (टीसी)च्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेल्या या गोरखधंद्यात रेल्वेत तिकिटांची धांदली करणारे अनेक जण सक्रिय असावे, असा संशय असून, त्या संबंधाने मध्ये रेल्वेकडून कसून तपास केला जात आहे. 

ट्रेन नंबर १२२९६ संघमित्रा एक्सप्रेसमध्ये ४ फेब्रुवारीला टीसीकडून तिकिट तपासणी सुरू असताना त्यांना काही भारतीय प्रवासी एफटी (विदेशी पर्यटक) कोट्यातील तिकिटांवर प्रवास करताना आढळले. विदेशी पर्यटकांना भारतात रेल्वेतून प्रवास करताना अडचण येऊ नये किंवा त्यांना तिकिट मिळवण्यासाठी त्रास होऊ  नये म्हणून एफटी कोटा अलाट केला जातो. मात्र, त्यासाठी संबंधित प्रवाशाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रवास करतानाही ही कागदपत्रे जवळ बाळगावी लागतात. संघमित्रा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे अशा प्रकारची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यावेळी टीसींनी त्यांची कसून चाैकशी केली. यात मोठे गाैडबंगाल असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी हे प्रकरण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविले. त्यानुसार, अशा प्रकारे एफटी कोट्यात तिकिट मिळवून प्रवास करणारांचे विविध तारखांच्या बुकिंगचे विश्लेषण करण्यात आले. त्यात एफटी कोट्याचा गैरवापर करून ३९ पीएनआर बुक केल्याचे आढळले. १२१ प्रवासी अनियमितपणे असा प्रवास करत असल्याचेही उजेडात आले.२४ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत एफटी कोट्याअंतर्गत ३१ गाड्यांसाठी मध्य रेल्वेचे १७४ ओरिजिनेटिंग पीएनआर तयार करण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे गैरप्रकाराचा अवलंब करून एफटी कोटा लाटणाऱ्या संबंधित प्रवाशांचे तिकिट रद्द करून त्यांना दंडाचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडून ३ लाख, ५६ हजार, ९१६ रुपये दंडाखातर वसूल करण्यात आले.  

गैरप्रकारात कुणाकुणांचा सहभाग 

रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या या गैरप्रकारात कुणाकुणाचा सहभाग आहे, त्याची चाैकशी केली जात आहे. यात कोणते अधिकृत बुकिंग एजंट सहभागी आहेत का, हे निश्चित करण्यासाठी आयआरसीटीसीकडून अतिरिक्त तपशील मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोणती शहरे, कुठून गैरप्रकार ?  

विदेशी पर्यटकांच्या कोट्यांवर डल्ला मारण्याचा हा गैरप्रकार कोणकोणत्या शहरातून करण्यात आला, त्या संबंधाने रेल्वेच्या मुंबईतील जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे आणि आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या संबंधाने तूर्त माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर दिले.

पश्चिम मध्य रेल्वेत जुनी शिफारसपत्र स्कॅन

विशेष म्हणजे, पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांचे खासगी सचिव अमितकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जुनी शिफारसपत्र स्कॅन केली. त्यात फेरफार करून त्याआधारे रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यातून अनेक वेटिंगवरील तिकिटे कन्फर्म केल्याचा आरोप आहे. उघडकीस आलेल्या या दोन्ही प्रकरणामुळे रेल्वेच्या विविध डिव्हीजननध्ये खळबळ निर्माण झाली आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Railway: Foreign Tourist Quota Scam Unearthed; 39 Cases Revealed

Web Summary : A scam involving the misuse of the foreign tourist quota in Central Railway has been exposed. 39 PNRs were booked irregularly, affecting 121 passengers. Fines of ₹3,56,916 were collected. An investigation is underway to identify involved booking agents and cities.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र