शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरपंच, उपसरपंचानी गड राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच, उपसरपंच यांनी पुन्हा विजयी होत आपले राजकीय अस्तित्व ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच, उपसरपंच यांनी पुन्हा विजयी होत आपले राजकीय अस्तित्व कायम राखले. यात सावंगी (घोगली) चे माजी सरपंच प्रज्वल तागडे तर सेलू (गुमथळा) चे माजी उपसरपंच प्रकाश पांडे यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येत हॅट्‌ ट्रि‌क साधली. गावपुढारी ग्रामपंचायत निवडणूक डोक्यावर घेत राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यात प्रसंगी आपला गट निवडणूक रिंगणात उतरवित स्वत:ही मैदानात उतरतात. या वर्षीच्या झालेल्या निवडणुकीत चार ग्रामपंचायतीमधून माजी सरपंच, उपसरपंच यांनी आपले राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. त्यात ते यशस्वीही राहिले. तालुक्यात प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या सेलु (गुमथळा) ग्रामपंचायत मधून माजी सरपंच चित्रा डोईफोडे व माजी उपसरपंच प्रकाश पांडे हे भाजपा समर्थित गटाकडून निवडणूक रिंगणात होते. येथे काँग्रेसतर्फे प्रदीप चणकापुरे यांनी सेलू येथून पाच उमेदवार निवडून आणले तर भाजपा समर्थित गटाकडून माजी सरपंच चित्रा डोईफोडे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. तसेच गुमथळा येथील माजी उपसरपंच प्रकाश पांडे यांनी याही वर्षीच्या निवडणुकीत भाजपा समर्थित पॅनल कडून तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्‌ ट्रि‌क केली तर पॅनल सुद्धा विजयी करत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. तसेच सावंगी (घोगली) ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच प्रज्वल तागडे यांनी घोगली या गावातून काँग्रेस समर्थित पॅनेल उभे केले होते. त्यांनी विजयाची परंपरा कायम राखत तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्‌ ट्रि‌क साधली आहे.

सावंगी येथून माजी सरपंच संजय तभाने हे दोन पंचवार्षिक सरपंच राहिले आहेत. त्यांनी यावे‌ळी पत्नी नीता तभाने यांना निवडणूक रिंगणात उभे करीत विरोधक उमेदवारापेक्षा तब्बल दुप्पट मताने विजय खेचून आणला. येथीलच माजी सरपंच मिना धरममाळी यांनीही विजय संपादन केला. तसेच कोहळी (मोहळी) ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय चिचखेडे यांनी निवडणूक रिंगणात उभे राहत काँग्रेस समर्थित पॅनलकडून ११ उमेदवार उभे केले. त्यापैकी ७ जागांवर विजय मिळविला. याच ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सुनंदा वानखेडे यांना काँग्रेस समर्थित पॅनल कडून उमेदवारी न दिल्याने त्यांचा मुलगा देवकांत वानखेडे यांनी अपक्ष म्हणून निवडून येत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. बिनविरोध झालेल्या सोनपूर (आदासा) ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच चेतन निंबाळकर यांना पुन्हा गाव सेवेची संधी मिळाली आहे.