शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

फ्लायओव्हरवर धावत्या कारला लागली आग; चालकाने उडी घेत वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:51 IST

Nagpur : वर्धा रोडवरील जयप्रकाश मेट्रो स्टेशनजवळील डबलडेकर फ्लायओव्हरवर बुधवारी सायंकाळी धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वर्धा रोडवरील जयप्रकाश मेट्रो स्टेशनजवळील डबलडेकर फ्लायओव्हरवर बुधवारी सायंकाळी धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, चालक उडी मारून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वीफ्ट डिझायर (एमएच २९ ०२८८) ही कार चालवणारे अमजद खान इब्राहिम खान (वय ३२, रा. बसंतनगर, पुसद) हे यशोधरानगर येथील रुग्णालयात नातेवाइकाला भेटून परत पुसदकडे जात होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास फ्लायओव्हरवर पोहोचताच कारच्या बोनटमधून धूर निघताना दिसला. परिस्थिती ओळखून त्यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी कारचे दरवाजे लॉक झाले. कसाबसा बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेमुळे फ्लायओव्हरवर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बेसा-पिपळा व नरेंद्रनगर केंद्रातून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, ही डिझेल इंजिनची कार असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मदतीऐवजी व्हिडिओ काढण्यात धन्यता

बेसा-पिपळा नगरपंचायतीच्या जलपुरवठा अभियंता पूजा जाधव या घरी जात असताना अजनी ते एअरपोर्टदरम्यान फ्लायओव्हरवर कारला आग लागलेली दिसली. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळविले. तसेच अग्निशमन अधिकारी संकेत प्रमोद माटे यांनाही माहिती दिल्यानंतर तातडीने अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले. मात्र, काही जण मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात धन्यता मानत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Car Catches Fire on Flyover; Driver Jumps to Safety

Web Summary : A speeding car caught fire on a Nagpur flyover. The driver jumped out just in time, escaping unharmed as the car was completely destroyed. Firefighters quickly extinguished the blaze, which caused a traffic jam. Short circuit suspected as the cause.
टॅग्स :Accidentअपघातcarकारfireआगnagpurनागपूर