संपत्तीसाठी छळल्यामुळेच 'त्या दोघीनी' स्वतः गळफास घेत मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:15 IST2026-05-05T19:14:59+5:302026-05-05T19:15:50+5:30

Nagpur : सासू व पत्नीच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करण्यासाठी पत्नीला मारहाण करीत असल्यामुळेच व्यंकटेशनगरातील आई व मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून नंदनवन पोलिसांनी आरोपी पती, सासू, सासरा, नणंद व भासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Both of them committed suicide by hanging themselves due to being tortured for wealth. | संपत्तीसाठी छळल्यामुळेच 'त्या दोघीनी' स्वतः गळफास घेत मृत्यूला कवटाळले

Both of them committed suicide by hanging themselves due to being tortured for wealth.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सासू व पत्नीच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करण्यासाठी पत्नीला मारहाण करीत असल्यामुळेच व्यंकटेशनगरातील आई व मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली असून नंदनवन पोलिसांनी आरोपी पती, सासू, सासरा, नणंद व भासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पती लोकेश सुधाकर ब्रहो (३०), सासरा सुधाकर ब्रहो (६०), सासू अनसूया सुधाकर ब्रहो (४८) सर्व रा. ओमनगर, सक्करदरा, नणंद प्राची अमोल डफ, अमोल डफ दोन्ही रा. अंबर अपार्टमेंट, मदन रतन सिटी, नंदनवन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १ मे २०२६ रोजी संगीता श्रीराम ढबाले (५२, रा. केडिके कॉलेजजवळ, व्यंकटेशनगर नंदनवन) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रहो (२९, रा. ओमनगर, सक्करदरा) यांनी व्यंकटेशनगर येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तपासात आकांक्षाचा पती लोकेश, सासू, सासरा, नणंद व भासरा यांनी लग्न झाल्यापासून आकांक्षाला माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर आकांक्षाला दोन महिन्यांपूर्वी मुलगा न होता मुलगी झाली व ती जन्मानंतर लगेच मरण पावल्यामुळे या छळात आणखी भर पडली.

त्यानंतर आरोपींनी आकांक्षा व तिची आई संगीता यांच्या नावे असलेली जमीन पती लोकेशच्या नावाने करण्यासाठी तिला क्रूर वागणूक देणे सुरू केले. त्यामुळे या छळाला कंटाळून आकांक्षाने व्यंकटेशनगर येथे आईसोबत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title : संपत्ति के लिए प्रताड़ना से माँ-बेटी ने की आत्महत्या।

Web Summary : नागपुर: संपत्ति के लिए प्रताड़ना से वेंकटेशनगर में माँ-बेटी ने आत्महत्या की। बेटी के पति, सास-ससुर और ननद पर जमीन पति के नाम करने का दबाव डालने का आरोप है, जिससे मानसिक और शारीरिक यातना हुई।

Web Title : Harassment for property led mother and daughter to suicide.

Web Summary : Nagpur: A mother and daughter in Venkateshnagar died by suicide due to harassment for property. The daughter's husband, in-laws, and sister-in-law are accused of demanding the land be transferred to the husband's name, leading to immense mental and physical torture.