शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अवैध कारवाई करीत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घर पाडण्यासाठी अवैध कारवाई करीत असल्याचा ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घर पाडण्यासाठी अवैध कारवाई करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने प्राधिकरणला नोटीस बजावून, यावर ७ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, तेव्हापर्यंत प्रकरणात यथास्थिती ठेवण्यास सांगितले आहे.

याचिकेवर न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संजय अवचार असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते केशवनगर, ता. रिसोड, जि. वाशीम येथील रहिवासी आहेत. रिसोड-मालेगाव रोडवर त्यांची दोन माळ्यांची इमारत आहे. हा रोड राष्ट्रीय महामार्ग ४६१-बी अंतर्गत येत असून त्यापासून इमारत १० फूट अंतरावर आहे. या घरामुळे महामार्गावरील वाहतुकीला काहीच अडचण होत नाही. असे असताना राष्ट्रीय महामार्ग उप-विभागीय अधिकाऱ्यांनी काही राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे २८ जानेवारी २०२१ रोजी नोटीस बजावून, घर रिकामे करण्याचा आदेश दिला, तसेच, आजुबाजूची घरे पाडण्याची कारवाई सुरू केली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. वादग्रस्त नोटीस रद्द करण्यात यावी व संबंधित घर याचिकाकर्त्याच्या मालकीचे असल्याचे जाहीर करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संतोष चांडे यांनी कामकाज पाहिले.