शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार?; संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:16 IST

पवार कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच अपघातावर करणार भाष्य, डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार 

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेला अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले होते. मात्र बारामतीत त्यांचे विमान लँडिंग होण्यापूर्वी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. परंतु पवार कुटुंबातील कुणीच या अपघातावर बोलले नव्हते. मात्र आता अजित पवारांचे पुतणे रोहित पवार पुढे आले आहेत. 

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी तात्काळ माध्यमांशी संवाद साधत हा अपघात असल्याचे म्हटलं होते. मात्र आता आमदार रोहित पवार संध्याकाळी ४ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेत आहेत. रोहित पवारांनी पोस्ट करून माहिती दिली की, बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पवार कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच अपघातावर करणार भाष्य 

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. त्यात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत दादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ३१ तारखेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. मागील १३ दिवसांपासून अजित पवारांच्या अपघातावर शरद पवार वगळता पवार कुटुंबातील कुणीही भाष्य करणे टाळले होते. या अपघातावर आजही अनेक जण संशय व्यक्त करत आहेत. मात्र अधिकृत माहितीशिवाय मी यावर बोलणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं होते. त्यात रोहित पवार प्रेझेंटेशन देत आज पत्रकार परिषदेत अपघातावर प्रश्न उपस्थित करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली होती. अजित पवार यांचा घातपात करण्यासाठी विमानात सुसाईड बॉम्बरचा वापर करण्यात आला असावा का?, या विमानाच्या वैमानिकालाही संमोहित करण्यात आलं होतं का?, अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानामधून सहा प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत होते. मग पाच जणांचा मृत्यू झाला, त्यातला सहावा प्रवासी कुठे गेला यासारखे विविध प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केले आहे. त्याशिवाय  DGCA ने विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's death: Big revelation expected; focus on press conference.

Web Summary : Rohit Pawar raises doubts about Ajit Pawar's death in a plane crash. He will reveal crucial points at a press conference in Mumbai. Speculation surrounds the circumstances, with questions lingering even within the family. Amol Mitkari also questioned the incident.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवार