शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिक मासात जावयाला सोने-चांदीची भेट का देतात? काय आहे धार्मिक महत्त्व ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:04 IST

Gadchiroli : भारतीय संस्कृतीत अधिक मासाला विशेष महत्त्व असून, या महिन्यात जावयाचा मान-पान करण्याची जुनी परंपरा आहे. यंदा १७ मेपासून अधिक मासाला सुरुवात होत असून, सासरच्या मंडळींनी जावईबापूंना 'धोंडा' देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

गडचिरोली : भारतीय संस्कृतीत अधिक मासाला विशेष महत्त्व असून, या महिन्यात जावयाचा मान-पान करण्याची जुनी परंपरा आहे. यंदा १७ मेपासून अधिक मासाला सुरुवात होत असून, सासरच्या मंडळींनी जावईबापूंना 'धोंडा' देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, सोन्या-चांदीच्या दरांनी घेतलेली गगनभरारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे यंदा जावयाचा 'धोंडा' नेमका कसा द्यावा, अशा विवंचनेत सासरेबुवा सापडले आहेत.

दर तीन वर्षांनी येणारा हा 'तेरावा महिना' यंदा १७ मे ते १५ जून या कालावधीत येत आहे. या महिन्यात जावयाला सोन्याचा किंवा चांदीचा धोंडा भेट देण्याची प्रथा आहे. गडचिरोलीच्या बाजारपेठेत सध्या सोन्याचे दर १ लाख ५७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीनेही अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशा स्थितीत जावयाचा मान राखताना सासरच्या मंडळींच्या खिशाला मोठी कात्री लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

काय आहे धार्मिक महत्त्व ?

हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची आराधना केली जाते. या काळात केलेले दान, जप आणि तप हे अक्षय फळ देणारे मानले जाते. म्हणूनच आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, या भावनेतून जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचे पूजन केले जाते.

धोंड्याच्या मानासाठी जावईबापूंना बोलावणे

अधिक मास सुरू झाला की ग्रामीण आणि शहरी भागातही जावयाला घरी जेवायला बोलावण्याची लगबग सुरू होते. गुळाचे ३३ अनारसे करून ते तांब्याच्या ताटात ठेवून जावयाला दान दिले जातात. अनेक ठिकाणी जावयाला नवीन कपडे आणि ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे दागिने देऊन त्याचा सन्मान केला जातो. मागील अनेक वर्षांपासून काही समाजामध्ये ही परंपरा आजही कायम जपली आहे.

सराफा बाजाराची काय तयारी ?

दर वाढले असले तरी ग्राहकांची गरज ओळखून गडचिरोलीतील सराफा व्यापाऱ्यांनी हलक्या वजनाचे दागिने आणि चांदीचे लहान धोंडे उपलब्ध करून दिले आहेत. ५०० मिलीग्राम ते १ ग्रॅममधील सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीची नाणी यांना मोठी मागणी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गॅससह तेलाचा भडका, अनारशांचीही पंचाईत !

केवळ सोने-चांदीच नाही, तर स्वयंपाकघरातील महागाईनेही सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे धोंड्याचा मुख्य पदार्थ असलेल्या 'अनारशांची' मेजवानीही यंदा महाग पडणार आहे. साखर, तूप आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्याने मिठाईच्या दुकानांतही अनारशांचे दर वधारले आहेत.

यंदा १७ मे पासून अधिक मास

खगोलशास्त्रीय गणनेनुसार, दर तीन वर्षांनी एक महिना अधिक येतो, ज्याला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हटले जाते. यंदा हा महिना रविवार, १७ मेपासून सुरू होऊन १५ जूनपर्यंत चालणार आहे. या काळात दानधर्माला आणि जावयाच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते.

काय आहेत सोन्या-चांदीचे दर?

सोने: (प्रती १० ग्रॅम) : १,५७,००० रुपये
चांदी: रुपये (प्रती किलो) : २,६७,००० रुपये


 

English
हिंदी सारांश
Web Title : Adhik Maas: Why gold-silver gifts to sons-in-law? Religious significance?

Web Summary : In Adhik Maas, sons-in-law are honored with gifts, especially gold or silver. This tradition, rooted in Hindu beliefs, symbolizes respect and ensures prosperity for the daughter's family. High gold and silver prices challenge families this year.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोली