शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती

By admin | Updated: May 19, 2016 03:57 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाडेघर परिसरातील आनंदसागर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला

कल्याण : ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाडेघर परिसरातील आनंदसागर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला आहे. सोसायटीच्या विकासकाने खतनिर्मितीचे मशीन खरेदी केली आहे. त्यात निर्माण होणारे खत तेथील उद्यानासाठी वापरले जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर केडीएमसीने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबरोबरच ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करणे यावर प्रामुख्याने भर दिला आहे. याअनुषंगाने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनाही आवाहन केले जात आहे. त्यास प्रतिसाद देताना आनंदसागर सोसायटीने ओल्या कच-यातून खतनिर्मितीचा प्रकल्प राबविला आहे. या सोसायटीतील पाच इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात ७० सदनिका आहेत. सध्या त्यात ५० कुटुंबे वास्तव्याला आले आहेत. प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून १० किलोच्या आसपास ओला कचरा गोळा होत आहे. शनिवार, ७ मे पासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी लागणारे मशीन विकासकाने खरेदी केली आहे. (प्रतिनिधी)।कचऱ्याचे वर्गीकरण काळाची गरजकेडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे सल्लागार श्रीकृष्ण भागवत यांनीही या सोसायटीला भेट देत तेथील सदस्यांना मार्गदर्शन केले. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. सोसायटीचा होणार सत्कारआपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे असे प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटींचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर केली होती. त्यानुसार संबंधित सोसायटीतील सदस्यांचा महापौर दालनात सत्कार करण्यात येणार असल्याचे देवळेकरांनी स्पष्ट केले.