शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचा इतिहास उत्खननाच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 26, 2014 02:56 IST

निधीअभावी बंद पडलेले उत्खनन पुढे कधीच सुरू न झाल्याने, इतिहासाची जाण असलेल्या वाशिमकरांना अद्यापही उत्खनन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे

नागेश घोपे, वाशिम - ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाशिम शहरात १९९३ ते १९९७ या कालावधीत पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात काही ऐतिहासिक अवशेष आढळून आल्यानंतरही, त्या वेळी निधीअभावी बंद पडलेले उत्खनन पुढे कधीच सुरू न झाल्याने, इतिहासाची जाण असलेल्या वाशिमकरांना अद्यापही उत्खनन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. वाशिम शहराला राजे वाकाटकांच्या राजधानीचा ऐताहसिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळी वत्सगुल्म या नावाने ओळखल्या जाणार्‍या या शहराच्या उदरात नाना ऐतिहासिक पुरावे दडलेले असावे, असा कयास आहे. पुरातत्त्व विभागाने शहरात १९९७पूर्वी केलेल्या उत्खननात काही पुराव्यांचे अवशेष आढळूनही आले होते; मात्र त्यानंतर पुरेशा निधीअभावी उत्खनन बंदच झाले. उत्खनन पुन्हा सुरू व्हावे यासाठी राजकीय तथा प्रशासकीय स्तरावर झालेले प्रयत्न थिटे पडले आहेत. शहरवासीयांचा रेटा, लोकप्रतिनिधींचा आग्रह तथा प्रशासनानाच्या पाठपुराव्यामुळे, पुरातत्त्व विभागाच्या नागपूरस्थित कार्यालयाने १९९३मध्ये उत्खनन सुरू केले होते. सर्वप्रथम चांमुडा देवी परिसरातील इंगळे यांच्या शेतात या उत्खननाला प्रारंभ झाला होता. त्या ठिकाणी शिवमंदिराच्या तळातील बांधकाम, अनेक मानवी सांगाडे व वाकाटककालीन २७ ताम्रनाणी सापडली होती. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाला दुजोरा मिळाला होता. त्याच पृष्ठभूमीवर, शहरातील विविध भागांतील उत्खननासाठी त्या वेळी शासनाने पाच वर्षांचा अवधी देऊन, ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता; पण तेवढ्या निधीत पाच वर्षे उत्खननाचे काम चालले नाही. दुसर्‍या टप्प्यात येथील लालदेव टेकडी अर्थात दिगंबर जैनांच्या क्षेत्रपालाच्या मंदिराखाली असलेल्या टेकडीवर खोदकामास सुरुवात झाली होती. तत्कालीन संयुक्त अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व्ही.के. देशमुख यांच्या साक्षीने सुरू झालेल्या उत्खननात, अष्टभुजाकृती मंदिराचे अवशेष, चांदीची नाणी, आठ फूट उंचीचा होम करण्याचा हौद, दिगंबर जैन तीर्थंकराच्या पाषाणाच्या मूर्ती, इतर स्वयंपाकाचे लाकडी व दगडी साहित्य सापडले होते. निधीअभावी येथील काम अपूर्ण राहिले. त्यानंतर लालमियाँ दर्ग्याजवळील टेकडीचे उत्खनन करण्यासाठी नागपूर येथून पथक येणार होते; पण नंतर आजपर्यंत तेथे उत्खनन झाले नाही.