शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 00:17 IST

Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आचार संहितेचे सर्वत्र राजरोस उल्लंघन होत असताना देखील पोलीस, महापालिका व आचार संहिता पथके कारवाई करत नसल्याची बातमी लोकमतने दिली होती. भाईंदर पूर्व येथील भाजपा नेत्यांच्या उपस्थितील राजकीय हळदीकुंकू कार्यक्रम व भेटवस्तू  वाटप प्रकरणी सुमारे १५० ते २०० नागरिकांच्या तक्रारी नंतर तब्बल ८ दिवसांनी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

आचार संहिता लागू असताना २३ डिसेंबर रोजी भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट फेस ११ व १२ मध्ये मे. सिद्धिविनायक सेवा चारिटेबल ट्रस्ट ह्या नावाने ज्ञानमती मिश्रा यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बॅनरवर भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचे छायाचित्र तर कार्यक्रमास मेहतांसह इच्छुक उमेदवार, भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

यावेळी राजकीय नेत्यांचे सत्कार केले गेले तसेच जमलेल्या मतदार महिलांना पक्षाचे स्टिकर लावून भेटवस्तूंचे वाटप केले गेले होते व त्या बाबतचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होऊन सुमारे १५० ते २०० नागरिकांनी ईमेल द्वारे तक्रारी केल्या होत्या. मात्र थेट सत्ताधारी पक्षाशी संबंधित तक्रार असल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्या ऐवजी प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांना पत्र देऊन कारवाईस सांगितले गेले. तर नवघर पोलीस ठाण्याने देखील कारवाईस टाळाटाळ केली. 

दरम्यान शहरात असे अनेक कार्यक्रम द्वारे आचार संहितेचे उल्लंघन होत असताना पोलीस, महापालिका आणि आचार संहिता पथके डोळेझाक करून आहेत. आलेल्या तक्रारींवर पण कारवाई न करता निवडणुकीतील उघड भ्रष्टाचार व गैरप्रकार ह्याला संरक्षण दिले जात असल्याची टीका होऊ लागली. त्या बाबत लोकमतने बातमी दिली. अखेर ३१ डिसेम्बर रोजी नवघर पोलिसांनी केवळ अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी समोर असताना देखील केवळ अनोळखी व्यक्ती वर गुन्हा दाखल केल्याने प्रशासनच आचार संहिता भंग करण्यास व करणारे यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत जागरूक नागरिकांनी पोलीस आणि पालिका अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच अन्य आचार संहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर पण तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhayandar: Code of Conduct Violation, FIR Filed After Eight Days

Web Summary : After Lokmat's report, police filed an FIR eight days after a complaint regarding a code of conduct violation involving a BJP event in Bhayandar. Despite numerous complaints about the event, which included gifting and political endorsements, authorities initially delayed action, prompting public criticism and calls for official suspensions.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५