शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 20:42 IST

Local Body Election 2025 Maharashtra: केवळ काही ठिकाणच्या मराठी मतांचा ठाकरे बंधूंना फायदा होईल, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.

Local Body Election 2025 Maharashtra: मुंबईत ठाकरे बंधूंचे काही एक चालणार नाही. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन चूक केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ऑल इंडिया’चा अजेंडा होता. उत्तर भारतीय आघाडी, गुजराती आघाडी, साऊथ इंडियन आघाडी, मुस्लिम मायनॉरिटी आघाडी अशा अनेक आघाड्या बनवल्या होत्या आणि त्याचा मोठा परिणाम झाला होता. सगळी मराठी मते मिळतील, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. केवळ काही ठिकाणच्या मराठी मतांचा त्यांना फायदा होईल, या शब्दांत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, राज्यातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्यात. मुंबई महापालिकेत १७ ते १८ तर पुणे महापालिकेत २० जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा झटका देण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

योग्य प्रतिनिधित्व द्यावे

महायुतीसोबत नैसर्गिक युती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचू लागला असून, आता वादग्रस्त विधान अन् वार-पलटवारांनी राजकीय मैदान गाजू लागले आहे. नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत. महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Athawale: Thackeray's influence waning in Mumbai; alliance with Raj a mistake.

Web Summary : Ramdas Athawale claims Thackeray's influence in Mumbai is diminishing and allying with Raj Thackeray was an error. He expects significant seats for the Republican party in upcoming Mumbai and Pune municipal elections, emphasizing the need for proper representation within the Mahayuti alliance.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२५Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे