शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी योगायोग...! "...तर दादा आज आपल्यात असते!"; अजित दादांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली? आमदार सरोज आहिरे यांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:59 IST

Saroj Ahir On Ajit Pawar Nashik : "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते."

राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी २०२६) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्यापही सावरू शकलेला नाही. दरम्यान, "अजित दादा यांनी शेवटची सही माझ्या मतदारसंघातील 'सिद्ध पिंप्री' गावच्या स्मशानभूमीच्या फाईलवर केली. या स्मशानभूमीला एक कोटी रुपये देऊन गेले दादा. शेवटचं काम माझ्यासाठी केलं," असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रूही थांबत नव्हते. त्या सिद्ध पिंप्री येथील शोकसभेत बोलत होत्या. 

"...तर, दादा आज आपल्यात असते" -
आहिरे म्हणाल्या, "आपल्या सर्वांना सांगते, महाराष्ट्राची धान खरेदीची फाईल, ज्याच्यासाठी दादा थांबले. नाहीतर ते गाडीने निघून जाणार होते. जर ते थांबले नसते तर, ते आज आपल्यात असते. त्यानंतर, ढिकले साहेबांनी एक फाईल पुढे केली. शेवटची सही माझ्या मतदारसंघातील 'सिद्ध पिंप्री' गावाच्या स्मशानभूमीच्या फाईलवर केली. या स्मशानभूमीला एक कोटी रुपये देऊन गेले दादा. शेवटचं काम माझ्यासाठी केलं. मी त्यांना कसे विसरणार आणि कसे अश्रू थांबणार."

"आज पवार कुटुंबाला आपल्या सर्व आमदारांची गरज आहे आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मुंबईला जात आहे. तेथे काय घडामोडी घडतायत काही समजत नाहीये, पण पक्षाचा आदेश आहे. आम्ही पवार कुटुंबासोबत कायम राहू आणि तुम्हीही त्यांच्यासोबत राहाल अशी अपेक्षा आहे," असेही अहेर म्हणाल्या.

"...जेणेकरून दादांची उणीव कमी भासेल" -
आहेर पुढे म्हणाल्या, "अजित दादांच्या उत्तराधिकारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार यांचा आज शपथविधी आहे, असे आम्ही बातम्यांमधून ऐकत आहोत. आम्ही कालच मागणी केली होती की, दादांचा उत्तराधिकारी म्हणून वहिनींना राज्य शासनाच्या कारभारात सामावून घ्यावं, जेणेकरून दादांची उणीव कमी भासेल."

"मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, हा शब्द दादांना देते" -
"ग्रामीण भागाची जाण असलेलं नेतृत्व, विकास कामाशिवाय दुसरं काही समजत नव्हतं, त्यांनी कधी घाणेरडं राजकारण केलं नाही, कधी जातपात मानली नाही. माझ्यासारख्या मागासवर्गीय मुलीला नेहमीच हात धरून पुढे नेण्याचं काम केलं. दादा, तुमची ही छोटी बहीण, आपल्यात रक्ताचं नातं नव्हतं, पण तुम्ही जो आशीर्वाद दिला, जे प्रेम दिलं, आणि जाता जाता शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या फाईलवर केली, हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, हा शब्द मी आज माझ्या दादांना देते, असेही आहेर यावेळी म्हणाल्या. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic Coincidence: Ajit Dada's Last File & Saroj Ahire's Statement

Web Summary : Ajit Pawar's last signature was on a file for a crematorium in Saroj Ahire's constituency. Ahire emotionally recalled Pawar's support and vowed loyalty to NCP. She also supported Sunetra Pawar as his successor.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस