शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:59 IST

'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाकरे सेनेचे नेते किशनचंद तनवाणी यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला. यावेळी मीडियाशी बोलताना सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह तत्कालीन मविआ सरकारवर जोरदार टीका केली. 

उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर दरोडेखोर असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'दरोडेखोर कोण, विकास करणारे की, विकासाचे मारेकरी? ज्यांनी अडीच वर्षात या महाराष्ट्रात फक्त दरोडा टाकला, लोकांना अंधारात ढकलले, राज्याला दहा वर्षे मागे नेले, सर्व विकासकामे बंद केली, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो...हे सर्व प्रकल्प बंद केले. या लोकांनी कोविडमध्येदेखील घोटाळे केले. उद्धव ठाकरे आणि मविआने अडीच वर्ष महाराष्ट्रावर दरोडा टाकला,' अशी घणाघाती टीका शिंदेंनी यावेळी केली. 

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

शिंदे पुढे म्हणतात, आम्ही अडीच वर्षात विकास केला, कल्याणकारी विकास योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातली. त्यामुळे दरोडा कोणी टाकला, हे जनतेला माहित आहे. फेक निगेटिव्ह पसरवून मुस्लीम लोकांना घाबरुन महाविकास आघाडीने प्रचार केला. संविधान बदलणार हे सर्व सांगून मुसलमान आणि दलितांना महाविकास आघाडीने फसवले. पण आता लोक हुशार झाले आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम आणि आदिवासींसह सर्वांना आम्ही पैसे देत आहोत, त्यामुळे आमच्यासाठी सर्व समान आहेत.'

संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्काछत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  'मध्य' मतदारसंघातील हिंदू मतांची विभागाणी टाळण्यासाठी उद्धवसेनेकडून मिळालेली उमेदवारी परत करणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसापूर्वीच त्यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे