शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त अभियानाचा ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न महाराष्ट्रभर जाणार, शुन्य रुपये खर्चात अभियान; नेमकं काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:48 IST

हा संपूर्ण महाराष्ट्रात राबण्याचे प्रशासनाला आदेश

विकास शहा शिराळा : येथील  २०२२ ला आयएएस अधिकारी विशाल नरवाडे हे प्रशिक्षणार्थी तहसीलदार काम पाहताना त्यांनी शून्य रुपये खर्चात पहिल्यांदाच कॉपी मुक्त अभियानचा "विशाल नरवाडे" पॅटर्न तालुक्यातील परिक्षा केंद्रावर राबविला होता. याची दखल घेऊन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश दिले आहेत.    गतवर्षी विशाल नरवाडे बुलढाणा येथेही जिल्ह्यात प्रथमच जिल्हा प्रशासनाने बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी अभिनव कॉपीमुक्ती अभियान राबवले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्रामध्ये कॉपी मुक्त अभियानचा "विशाल नरवाडे" पॅटर्न राज्यभर राबविण्याचा आदेश मुख्य सचिवांनी दिला आहे. १० वी व १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्चपर्यंत राज्यभर चालणार आहेत.  बहुतांश ठिकाणी राज्यभर परीक्षेदरम्यान गैरमार्गाने काॅपी करणे सर्वत्र कमी जास्त प्रमाणात दिसून येते. या संदर्भात ‘ कॉपीमुक्त परीक्षा’ घेणे प्रशासनासमोर नेहमीच आव्हान असते. कॉपीच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी महसूल पथक, पोलिस पथक, बैठे पथक, भरारी पथके अशी यंत्रणा सध्या कार्यरत आहे. परंतु परीक्षा एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असल्याने  सर्व विभागांचे इतके मनुष्यबळ उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हानात्मक बनले आहे. या संदर्भात विशाल नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन मॉडेल तयार केले आहे. यासाठी मुख्य सचिव सौनिक यांची बैठक झाली यावेळी राज्यातील क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून सूचना आणि सर्वोत्तम पद्धती विचारल्या गेल्या. त्यानुसार मुख्य सचिवांनी तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत यंदाच्या वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश दिले.काय आहे विशाल नरवाडे पॅटर्नया मॉडेलमध्ये झूम तंत्रज्ञानाचा प्लॅटफॉर्म ऑडिओ-व्हिडिओ मोडमध्ये वापरला जातो. जिल्हा स्तरावर, केंद्रीकृत झूम बैठक तयार केली जाते. लिंकद्वारे प्रत्येक पर्यवेक्षकाने त्यांच्या मोबाईलवरून कॅमेरा चालू ठेवला जातो. परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मोबाईल सायलेंट आणि म्यूट ठेवण्यात येतात. या मोबाईलद्वारे परीक्षा लिहिणारे सर्व विद्यार्थी दिसावेत. अशा प्रकारे सर्व परीक्षा केंद्रे आणि सर्व परीक्षा केंद्रांमधील सर्व ब्लॉक, वर्ग लाइव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये कव्हर केले जातात. परीक्षा-संदर्भात कोणीही काॅपी करतांना आढळल्यास, जिल्हास्तरीय होस्ट अनम्यूट करतात आणि संपूर्ण जिल्ह्याला ऐकू येतील अशा सूचना देतात. राज्यात आणि कदाचित देशात पहिल्यांदाच, कोणत्याही प्रशासकीय कार्यालयाकडून राज्य मंडळाच्या परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतका साधा, नाविन्यपूर्ण वापर केला.

टॅग्स :Sangliसांगलीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीGovernmentसरकार