शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

महिला, बालविकास कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; ‘लाडकी बहीण’च्या कामावर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:11 IST

६२०० कर्मचारी सहभागी, १२ पासून सामूहिक रजा

सांगली : महिला व बालविकास विभागातील प्रलंबित समस्या व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ६ हजार २००, तर राज्यभरात सहा लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बुधवारपासून ऑनलाइन बैठका, कामकाजाचे अहवाल देणे आणि लाडकी बहीण योजनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे.

महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. सांगलीत जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) सोमनाथ रसाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, तासगावचे बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले, सुहास बुधावले, अमोल पाटील, रेखा रूपनर, राजकुमार ऐवळे यांच्यासह विविध तालुक्यांचे अधिकारी उपस्थित होते.

विविध पदांचा आकृतिबंध सर्वसमावेशक करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला व बालविकास विभाग यंत्रणा निर्माण करावी, विविध योजनांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे, विविध संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करावी, जिल्हा परिविक्षा अधिकारी पद राजपत्रित घोषित करावे, पर्यवेक्षिका व मुख्य सेविका संवर्गाचे एकत्रीकरण करून वेतन तफावतीत सुधारणा करावी, विविध स्तरांवरील पदोन्नतीचे प्रस्ताव विहित कालमर्यादेत पूर्ण करावेत,

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, त्यांचा स्वतंत्र सेवा प्रवर्ग तयार करावा, तोपर्यंत त्यांच्यासाठी नवीन कामगार संहितेनुसार सर्वसमावेशक धोरण निर्मिती करावी, धोरणांच्या निर्मिती प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

काळ्या फिती लावून काम

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी व मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. बुधवारपासून लाडकी बहीण योजनेसह विविध कामांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारीस काम बंद आणि १२ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा आंदोलन केले जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Women and Child Development Staff Launch Statewide Protest, Boycott Scheme

Web Summary : Maharashtra's Women and Child Development staff protest pending issues, boycotting the 'Ladki Bahin' scheme. Over six lakh employees statewide participate, demanding better policies, resources, and fair treatment. Further actions include work stoppages and mass leave.