शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना मांडणार राज्याचा विकास आराखडा

By admin | Updated: June 19, 2014 03:12 IST

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शिवसेना कोणती कामे हाती घेईल, याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईयेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शिवसेना कोणती कामे हाती घेईल, याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने राज्याचे वाटोळे केले, आम्ही ते होऊ देणार नाही, असे सांगत अन्य कोणत्याही पक्षाच्या आधी शिवसेना आपली विकासाची ब्लू प्रिंट जनतेसमोर ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंटच्या आधीच ही पुस्तिका तयार केली जाणार आहे.उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असा एका ओळीचा ठराव उद्या होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यात मांडला जाईल, ज्यावर शिवसेना नेते शिक्कामोर्तब करतील. आजपासून शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात झाली. आज माध्यमांना सभागृहात प्रवेश नव्हता. उद्या सकाळी आदित्य ठाकरे भाषण करतील तर दुपारी उद्धव यांचे भाषण होईल. गाव तेथे शिवसेना, घर तेथे भगवा, असे नारेदेखील उद्या राज्यभर नेण्याचे आदेश दिले जातील. आता भाजपाच्या मतदारसंघांत देखील उद्धव दौरा करतील. येत्या २३ जून ते २४ जुलै या दरम्यान उद्धव ठाकरे अमरावती, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, पुणे, रत्नागिरी आणि पालघर येथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेने राज्याचा विकास आराखडा तयार केला असून, त्याचे सादरीकरण उद्याच्या मेळाव्यात केले जाऊ शकते. तसे न झाल्यास त्याच्या पुस्तिका बनवण्याची योजना आहे. जिल्हाजिल्ह्यातील प्रलंबित विकासाचे अनेक प्रकल्प त्यात मांडले जाणार आहेत. शिवाय अनेक जिल्ह्यांत नवनवीन कोणत्या गोष्टी केल्या जातील याचीही माहिती त्यातून दिली जाणार आहे. उद्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल वाजवतील आणि त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.