शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर... ; उदय सामंतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:30 IST

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारल्यास या पदावर उदय सामंत विराजमान होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

Shiv Sena Uday Samant ( Marathi News ) : "मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. या मागणीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र शिवसेनेतील इतर ५९ आमदारांपैकी कोणीही या पदासाठी इच्छुक नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेतील इतर नेत्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा सुरू आहे, ती थांबली पाहिजे," अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारल्यास या पदावर उदय सामंत विराजमान होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी पत्रकार परिषदेतून खुलासा करत ही चर्चा फेटाळून लावली आहे.

"एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची इच्छा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही आणि ती जबाबदारी आमच्यातील इतर कोणावर टाकण्याचा प्रयत्न केला तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांनाच आम्ही नेते मानलं आहे आणि आमचं राजकीय करिअर त्यांच्या हाती सोपवलं आहे," अशा शब्दांत उदय सामंत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

"ती बातमी खोटी"

उदय सामंत यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन एका मराठी वेबसाइटवर एक वृत्त प्रकाशित झाले होते. "एकनाथ शिंदे हे संघटक म्हणून काम करणार होते. मात्र तुमचा पक्ष विलीन होणार असल्याने तुम्ही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, असं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं," अशा आशयाचं ते वृत्त होतं. मात्र मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसताना माझ्या तोंडी हे शब्द टाकण्यात आले आहेत, असा दावा सामंत यांनी केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतMahayutiमहायुती