शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:35 IST

Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske News: उद्धव ठाकरे पराभूत झालेले व्यक्ती आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केले, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske News: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले, पण तशी घोषणा करण्यात आली नाही. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्धवसेनेवर टीकास्त्र सोडत आहेत.

पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना दोन ओळीही मराठी बोलता येत नाहीत. प्रियांका चतुर्वेदी दोन शब्द मराठीत बोलू शकत नाहीत. त्यांना तर बाळासाहेब ठाकरे हे नाव स्पष्ट घेता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मराठीविषयी बोलण्याचा अधिकार काय? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला.

राज ठाकरे आमच्याविरोधात काही बोललेले नाहीत

राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्याविरोधात बोलायचा विषय नाही. मराठी भाषेविषयी तळमळ, मराठी विचार याबाबतचा तो मेळावा होता. तो मेळावा कोणत्या पक्षाचा नव्हता. त्याच पद्धतीत त्यांनी भाषण केले. त्यातून मराठीविषयीची त्यांची तळमळ दिसून आली. राज ठाकरे आमच्याविरोधात काही बोललेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असे भासवून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भडकावून त्यांची मते मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता.  उद्धव ठाकरे पराभूत झालेले व्यक्ती आहेत. एकनाथ शिंदे काय आहे, त्यांची ताकद काय, त्यांच्या मागचा जनाधार त्यांनी दाखवून दिला आहे. मोठा जनाधार मिळाला आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाnaresh mhaskeनरेश म्हस्केUddhav Thackerayउद्धव ठाकरे