शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पावसाचा जोर कमी

By admin | Updated: July 18, 2014 00:44 IST

दमदार पावसासाठी पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा

अकोला : पश्‍चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गत तीन दिवसांत विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली; परंतु पाऊस प्रणाली पुन्हा अशक्त झाली असून, सार्वत्रिक पावसाचे ढग उत्तर-पूर्वेकडे वळल्याने, विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आता सार्वत्रिक पावसासाठी आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी मात्र येतच राहतील.
गत सोमवारपासून ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी छत्तीसगड व विदर्भात तीन दिवस दमदार पाऊस पडला; परंतु आता हे पावसाचे ढग उत्तर-पूर्वेकडे वळले आहेत. सध्या पूर्व मध्य प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. विदर्भात पाऊस येण्यासाठीची जी पाऊस प्रणाली आहे, ती यामुळे अशक्त झाली आहे. पाऊस प्रणाली साधारणत: दर आठ दिवसांनी विकसित होत असते. त्यामुळे आता पावसासाठी आणखी पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकीत, नागपूर वेधशाळेने वर्तविले आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत, विदर्भातील हिंगणा येथे १८ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली असून, कळंबेश्‍वरला १६ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. उमरेड येथे १५, चिमूरला १२, तर सावनेर, समुद्रपूर, नागपूर, भिवापूर, परसेओणी व कुही येथे प्रत्येकी ११ सेंटिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. तूमसरला १0, वर्धा, खारंचा व सेलू या ठिकाणी प्रत्येकी ९, तर हिंगणघाट, तिवसा, मोहाडी, आर्वी व आष्टी येथे प्रत्येकी ७ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. रामटेक व सालेकसा येथे प्रत्येकी ६ सेंटिमीटर, तर मौदा, चिखलदरा, अमरावती, तिरोरा, मोर्शी, आमगाव व धामणगाव रेल्वे येथे प्रत्येकी ५ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धारणी, गडचिरोली, देवळी, चांदूर रेल्वे, पिनी, वरोरा, चांदूर बाजार, आकोट व सिंदेवाही या ठिकाणी ४ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. मारेगाव, परतवाडा, देऊळगाव राजा, कामठी, गोरेगाव, राळेगाव, अर्जुनी-मोरगाव, बाभूळगाव, वरूड, आरमोरी, गोंदिया, लोणार, मेहकर, यवतमाळ, भद्रावती व चार्मोशी येथे ३ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अंजनगाव, सडक अर्जुनी, बटकुली, भंडारा, देवरी, वणी, कोपर्णा, कुरखेडा, ब्रम्हपुरी, आमरागड, धानोरा, मुल, लाखांदूर, साकोली, नांदगाव काझी, देसाईगंज, झरी झामणी, दर्यापूर व जोईली येथे २ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेल्हारा, चंद्रपूर, घाटंजी, कळम, बल्लारपूर, नेर, मुर्तिजापूर, राजूरा, रिसोड, जळगाव जामोद, संग्रामपूर, अहेरी, शेगाव, गोंड पिपंरी, अकोला, दिग्रस, सिंदखेड राजा, लाखणी, वाशिम, पोमभूर्ण, धारवा नागभिड, व अरणी येथे प्रत्येकी १ सेंटिमीटर पावसाची नोंद वेधशाळेने केली आहे.