शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित एम्स रुग्णालय विदर्भ-मराठवाडयाच्या सिमेवर उभारावे!

By admin | Updated: July 22, 2014 22:20 IST

जिल्हा सरचिटणीस डॉ. ढोके यांची मागणी

वाशिम: केंद्रातील मोदी सरकारने २0१४-१५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या अर्थ संकल्पात देशात नविन एम्स रुग्णालय सुरु करण्याची घोषणा केली असून त्यापैकी एक विदर्भात होणार आहे. नविन एम्स रुग्णालय विदर्भातील वाशिम या ऐतिहासीक शहरात उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.दीपक ढोके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.डॉ.दीपक ढोके यांनी निवेदनात नमुद केले आहे की, भारतातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या कार्य आणि निर्णय क्षमतेवर विश्‍वास ठेवून त्यांच्या नेतृत्वात देशासाठी अच्छे दिन पाहण्यासाठी पूर्ण बहुमत दिले आहे. याची सुरुवात १0 जुलै रोजी जाहीर झालेल्या सबका साथ, सबका विकास अशा सर्वसमावेशक अर्थ संकल्पातून दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलेल्या अर्थ संकल्पातील आनंदाची बाब म्हणजे नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्‍वासनापैकी देशात चार नविन एम्स रुग्णालय सुरु होत असून त्यापैकी एक महाराष्ट्रातील विदर्भात होणार आहे. एम्स रुग्णालय झाल्यास मोठी आरोग्य सुविधा विदर्भवासीयांना मिळणार आहे. सदर रूग्णालय नागपूर ऐवजी वाशिमला सुरू करावे अशी मागणी ढोके यांनी केली आहे. ** विदर्भात पूर्वीपासूनच नागपूर येथे मेडिकल कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पीटल, सुपर स्पेशालीटी तसेच खासगी मोठ मोठे हॉस्पीटल आहेत. नागपूर पासून २00 कि.मी. अंतरावर रायपूरमध्ये एम्स रूग्णालय असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नविन एम्स रुग्णालय विदर्भात वाशिम या मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे असेही डॉ. दीपक ढोके यांनी म्हटले आहे.** वाशिमला दळणवळणासाठी राष्ट्रीय, राज्य महामार्ग तसेच रेल्वे मार्ग असून वाशिम हे ठिकाण विदर्भ व मराठवाडयाच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथे एम्स रूग्णालय सुरू झाल्यास त्याचा लाभ संपूर्ण विदर्भ, मराठवाडयातील जनतेसोबत २00 कि.मी. अंतरावरील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील रुग्णांना मिळू शकतो.शिवाय जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सेवा मिळून वाशिम जिल्हयाच्या विकासाला मोठी गती मिळेल.