शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:23 IST

५० पेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांना प्रत्यक्ष सभेची मुभा : मोठ्या संस्थांना मात्र ऑनलाइनचे बंधन कायम राहणार

मुंबई : राज्यातील ज्या सहकारी संस्थांची सभासद संख्या ५०पेक्षा कमी आहे त्यांना प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, ५० हून अधिक संख्या असलेल्या संस्थांना ऑनलाइन पद्धतीनेच वार्षिक सभा घ्याव्या लागणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष उपस्थितील सर्वसाधारण सभांवर बंदी घालण्यात आली होती. त्याऎवजी ऑनलाइन पद्धतीने सभा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बंदीतून आता ५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या संस्थांना वगळण्यात आले आहे. अशा संस्थांना आता कोरोना नियमांचे पालन करत सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सर्वसाधारण सभेचे आयोजन करता येणार आहे. तर, ५० हून अधिक संख्या असलेल्या संस्थांना ऑनलाइन पद्धतीनेच सभा घ्याव्या लागणार आहेत. 

सभेबाबतच्या माहितीची जाहिरात द्यावीज्या संस्थांच्या सभासदांची संख्या ५०हून अधिक आहे, त्यांना ऑनलाइन पद्धतीने सभा घ्यायच्या आहेत. संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व ऑनलाइन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस, मेल, व्हॉट्‌सॲपद्वारे द्यावे लागणार आहे. सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डावर, संस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावीत. तसेच ज्या सभासदांचे ई-मेल, पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाइल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणाऱ्या विषयाबाबतची माहिती सात दिवसांत पत्राद्वारे पोहोच करावी, असे सहकार विभागाने म्हटले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेऊन, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात द्यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र