पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ...
राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता ...
- जमीर काझी मुंबई : मंत्री व सनदी अधिकाºयांच्या दिमतीसाठी लाखो रुपये खर्चून आणलेली मात्र नादुरुस्त झाल्याने मंत्रालयाच्या परिसरात कित्येक वर्षांपासून पडून असलेली वाहने हलविण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने ती त्वरित अन्यत्र स्थलांतर ...
सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते. ...
१९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील दुसºया खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा व अन्य चार जणांना दोषी ठरवले. याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. त्यामुळे निकालाची तारीख २२ आॅगस्ट रोजी निश्चित ...
आपल्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामावरील कारवाई थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित नाही व मुख्यमंत्र्यांनी अशी स्थगिती देणे योग्य नाही, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीची तब्बल १२ हजार हेक्टर जमीन विनाअधिसूचित करून तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी सभागृहात अर्धवट निवेदन करून विधिमंडळाची दिशाभूल केली आहे. ...
एरवी राजकीय आखाड्यात एकमेकांवर तुटून पडणारे विविध पक्षांचे आमदार आज चक्क मैदानात उतरले आणि त्यांनी फुटबॉल मॅचच्या आनंद लुटला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुमासदार शैलीतील कॉमेन्ट्रीने रंगत आणली. ...
निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत ...