शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Onion Price : कांदा आणखी रडवणार; यंदा शंभरी पार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:32 IST

Onion Price : घाऊक बाजारात विक्रमी दर; जानेवारीअखेरपर्यंत राहणार महागच

- योगेश बिडवईमुंबई : जोरदार पाऊस व त्यानंतर अवकाळीच्या तडाख्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने लाल कांद्याची अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत कांदा महागच राहण्याची चिन्हे आहेत. घाऊक बाजारात कांदा क्विंटलला विक्रमी साडेसात ते आठ हजार रुपयांवर गेल्याने किरकोळ बाजारात कांदा शंभर रुपयांच्या वर जाण्याची भीती आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये रोज साधारण साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक होते. डिसेंबरमध्ये ती विक्रमी असते. सध्या रोज सरासरी पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. उन्हाळ कांद्याची आवक टिकून असल्याने भाव थोडे नियंत्रणात आहेत. मात्र मेमध्ये शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा आता चाळींमध्ये खराब झाला असून तो संपतही आला आहे. नवा कांदा बाजारात येण्यास उशीर होत आहे.पावसाच्या माºयामुळे खरिपाच्या पूर्वार्धातील कांदा पूर्णत: तर उत्तरार्धात पीक अंशत: खराब झाले. परिणामी यंदा कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याच्या निर्णयाचाही अपेक्षित फायदा होणार नाही.पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ८ नोव्हेंबरनंतर बी पेरले. रोपांची वाढ होण्यास दीड महिना आणि त्यानंतर तीन महिन्यांनी कांदा बाजारात येईल, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सोलापूरला ८ हजार रुपये क्विंटलसोलापूर बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला सर्वाधिक ८ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सर्वाधिक सात हजार तसेच सरासरी ६४५१ आणि लाल कांद्याला सर्वाधिक ५९६१ तर सरासरी ५५00 रुपये दर मिळाला. नगरच्या बाजार समितीत सर्वाधिक ७६00 रुपये दर मिळाला.

टॅग्स :onionकांदा