शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्यांना फटका; उत्पादन घटले, दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 09:12 IST

कोथिंबीर जुडी ८० रुपयांवर : टोमॅटोसह गाजर, मिरचीचे दरही वाढले

नवी मुंबई : अवकाळी पाऊस व ऑक्टोबर हिट यामुळे राज्यात भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये गवार १०० ते १२० रुपये व वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो  दराने विकला जात आहे. कोथिंबीर जुडी ५० ते ८० रुपयांना विकली जात आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उत्पादन जास्त झाल्यामुळे मुंबईमध्येही  भाजीपाल्याचे दर घसरले होते. परंतु ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच राज्यभर अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर हिटचाही पिकांवर परिणाम झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक घटली असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये एक आठवड्यापूर्वी गवारचे दर ३० ते ७० रुपये किलो होते. सोमवारी हे दर ५० ते ९० रुपयावर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये तब्ब्ल १०० ते १२० रुपयांवर पोहचले आहेत.  बाजार समितीमध्ये हिरवा वाटाणा ८० ते १४० रुपये किलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा विक्रमी १६० ते १८० रुपये किलो दराने विकला जात आहे. कोथिंबीरचे दरही एक आठवड्यात दुप्पटपेक्षा जास्त वाढले आहेत. बाजार समितीमध्ये एक आठवड्यापूर्वी १० ते ३५ रुपये प्रति जुडी दराने विक्री होत होती. सोमवारी हे दर ३५ ते ६० रुपयांवर पोहचले असून, किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ८० रुपयांवर गेले आहेत. कोबी वगळून सर्व भाज्या महागल्या असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट बिघडले आहे. पुढील दोन आठवडे भाजीपाल्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ग्राहकांना झळ सोसावी लागणार आहे.कांद्याने गाठली पन्नाशीचाळींमध्ये साठविलेला कांदा संपत आला असून, नवीन कांदा येण्यास विलंब होत असल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर २५ ते ३५ रुपये किलो वर पोहचले असून, किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने पन्नाशी गाठली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरी, पुढील काही दिवसात कांदा पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. वस्तू     ११ ऑक्टोबर (एपीएमसी)    १८ ऑक्टोबर(एपीएमसी)     १८ ऑक्टोबर(किरकोळ)गवार     ३० ते ७०      ५० ते ९०     १०० ते १२०काकडी     ८ ते २०     १० ते २२      ४० ते ५०कोबी     ६ ते १०      ८ ते १४      ३० ते ४०फरस बी     ३० ते ३६     ३० ते ४०     ६० ते ८०गाजर      २० ते २४     २४ ते ३६    ६० ते ८०कारली     १६ ते २०     २० ते २४     ५० ते ६० टोमॅटो     १५ ते ३८     २५ ते ४५     ६० ते ८०वाटाणा     ८० ते १२०     ८० ते १४०     १६० ते १८०मिरचे     २४ ते ३०      ४० ते ४५      ६० कोथिंबीर     १० ते ३५      ३५ ते ६०      ५० ते ८०

टॅग्स :vegetableभाज्या