शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला घरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 07:00 IST

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट निम्म्यापेक्षा अधिक जागा अद्याप रिक्त

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची पारंपरिक अभ्यासक्रमास पसंतीनिम्म्यापेक्षा अधिक जागा अद्याप रिक्त

राहुल शिंदे - पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील अभियांत्रिकीच्या ४८ टक्के, एमसीएच्या ४४ टक्के, हॉटेल मॅनेजमेंटच्या ४८ टक्के, आर्किटेक्चरच्या ४६ टक्के जागा चालू शैक्षणिक वर्षात रिक्त राहिल्या आहेत. प्रामुख्याने उद्योग क्षेत्रातील मंदी, क्षमता नसताना विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश आणि व्यावसायिक पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांनी याबाबत चिंतन करण्याची आवश्यकता आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणाºयासाठी लाखो रुपए खर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ ते २५ हजार रुपयांची नोकरी मिळत आहे. तसेच क्षमता नसताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थीशिक्षण अर्ध्यावर सोडून घरती बसतात. त्यामुळे इतर विद्यार्थी व पालकांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. त्यातच गेल्या काही वर्षात आकेर्टेक्चर व फार्मसी अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्यामुळे या जागा रिक्त राहत आहेत. या उलट बीएस्सी, बी.कॉम, बीबीए ,बीसीए अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवून विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट,आर्किटेक्चर, मास्टर इन कॅम्प्युटर अ?ॅप्लिकेशन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या एकूण ३ लाख १८ हजार ६६० जागा आहेत. त्यातील १ लाख ८८ हजार ८१८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित १ लाख २९ हजार ८४२ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदा राज्यातील विविध व्यासायिक अभ्यासक्रमाच्या एकूण ४१ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक उद्योगांनी आर्थिक मंदीमुळे कामगार कपात केली आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याचाही फटका व्यावसायिक अभ्यासक्रमाला बसत असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.--व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी अभ्यासक्रमाचे नाव     शैक्षणिक संस्थांची संख्या     प्रवेश क्षमता     झालेले प्रवेश     रिक्त राहिलेल्या जागा अभियांत्रिकी                      ३४०                               १,२७,५३७              ६५,९२३           ६१,६१४ (४८)फार्मसी                            २९२                                 २२,५००                १८,५५३            ३,९४७ (१८)एमसीए                             ९१                                    ६,३८८                 ३,५५८             २,८३० (४४)हॉटेल मॅनेजमेंट                ११                                      ७८६                      ४०६              ३८० (४८)आर्किटेक्चर                      ८७                                     ५,५३७                   २९८९             २,५४८ (४६)एमबीए                             ३१७                                    ३३,९१५                २९,६५६         ४,२५९ (१३)इंजिनिअरिंग डिप्लोमा    ४७३                                  १,५९,८०४                ७०,४०५          ८९,३९९ (५५.९४)फार्मसी डिप्लोमा             २३७                                   १४,९८३                 १०,२४४        ४,७३९ (३१.६३)

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयbusinessव्यवसायEducationशिक्षण